बीड, 05 डिसेंबर : बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. तालमीतील मल्लाने पराभूत केल्याच्या रागातून एका पैलवानाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 20 जणांविरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपींमध्ये महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल सईद चाऊसचा मुख्य आरोपी म्हणून समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज रामदास पवार असे मारहाण झालेल्या मल्लाचे नाव आहे. मनोज पवार हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता मल्ल सईद चाऊस याच्या तालमीत काही दिवस जात होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने तालीम सोडली होती. दरम्यान काही कुस्ती स्पर्धांमध्ये त्याने सईदच्या तालमीत प्रशिक्षण घेणाऱ्या मल्लांचा पराभव केला होता. याचा राग मनामध्ये धरून सईद चाऊस आणि त्याच्या तालमीतील इतर मल्लांनी मनोज पवार यांची दुचाकी अडवली.
(दीड लाखात द्या, लग्न लावून देतो, औरंगाबादेत फेक नवरी मंडळाचा पर्दाफाश)
'तू पूर्वी आमच्या तालमीत येत होतास, आता का येत नाही, आमच्या पैलवानांना का पाडतोय' असे म्हणून बेदम मारहाण केली. एवढचं नाहीतर या टोळक्याने त्याच्यावर चाकू हल्ला करुन खिशातील १० हजार काढून घेतले. या घटनेनंतर मनोज पवार याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
शेळी पालन व्यवसायातून अधिक उत्पन्नाचे आमिष दाखवून 12 लाखाला फसवले
दरम्यान, शेळीपालन व्यवसायात जास्त उत्पन्नाचे आमिष दाखवून शेतकरी महिलेची तब्बल साडेबारा लाख रुपयाची फसवणूक केल्याची घटना बीडच्या परळी शहरात समोर आली. रत्नप्रभा प्रमोद परळीकर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस स्टेशन करण्यात आला आहे.
(45 वर्षीय महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके, मुंबई हादरली)
अॅग्रो फूडस कंपनीचे शहरात कार्यालय होते. या कार्यालयाने त्यांना शेळी पालन व्यवसायातून अधिक उत्पन्नाचे आमिष दाखवले. त्यांना १०० शेळ्या, अडीच एकरात पत्र्याचे शेड आणि २५ हजार रुपये महिना देण्यात येईल असे सांगण्यात आले. गुंतवणुकीसाठी त्यांच्याकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये या प्रमाणे टप्प्याटप्प्याने एकूण साडेबारा लाख रुपये विविध प्रकारची फीस म्हणून घेतले गेले. मात्र, कंपनीने ना त्यांना शेळ्या दिल्या, ना शेड व ना २५ हजार रुपये महिना, आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. कंपनीतील पाच जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news