Home /News /maharashtra /

...तर नरभक्षक बिबट्याला शुटरच्या माध्यमातून ठार मारण्याची परवानगी घेणार : धनंजय मुंडे

...तर नरभक्षक बिबट्याला शुटरच्या माध्यमातून ठार मारण्याची परवानगी घेणार : धनंजय मुंडे

'या टीमला यश आले नाही तर रात्रीतून राज्यातील सर्व टीमला आष्टीत पाचारण करण्यात येईल.'

बीड, 28 नोव्हेंबर : 'नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी औरंगाबाद, अमरावती, पुणे, जुन्नर, नगर, बीड येथील टीम बोलवाल्या आहेत. त्यातही यश मिळाले नाही तर वन्यजीव विभागाची परवानगी घेऊन बिबट्याला शुटरच्या माध्यमातून ठार मारण्याची परवानगी घेणार आहे,' अशी माहिती बीडचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी दिली आहे. आष्टी तालुक्यातील सुर्डी आणि किन्ही येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा जीव गेला. त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे आज आष्टी तालुक्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. मी यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगाबाद, नागपूर येथील अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. या टीमला यश आले नाही तर रात्रीतून राज्यातील सर्व टीमला आष्टीत पाचारण करण्यात येईल. शेवटी वन्यजीव विभागाची परवानगी घेऊन शुटरच्या माध्यमातून बिबट्याला ठार करण्यात येईल. याबाबतच्या परवानगीसाठी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री मुंडे यांनी दिली. पंकजा मुंडेंनी केली आहे मागणी बीड व अहमदनगर जिल्ह्यातील मानवी वस्ती मधील बिबट्याचे हल्ले चिंताग्रस्त आहेत. राज्य सरकारने हे हल्ले गांभीर्यपूर्वक घ्यावेत आणि ड्रोनद्वारे, नाईट व्हीजन कॅमेरे व जास्तीत जास्त पिंजरे लावून बिबटयाचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वनमंत्री संजय राठोड यांना आज पुन्हा पत्र पाठवून केली आहे, अशी माहिती भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच दिली होती.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Beed, Dhananjay munde

पुढील बातम्या