बीड, 06 मार्च : भर रस्त्यात पत्नीला नग्न करत गुप्त अंगावर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. जमिनीच्या दाव्याच्या तारखेला न्यायालयामध्ये आलेल्या 29 वर्षीय महिलेला तिच्या पतीने नग्न करून गुप्त अंगावर अमानुष मारहाण केली. यासंबंधी महिलेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
जमिनीच्या दाव्याचं प्रकरण आपसात मिटवून घेवू असं असं पतीचं म्हणणं होतं. पण पतीने कोर्टात धाव घेतली. म्हणून बळजबरीने गेवराई तालुक्यतील सिरसदेवी अर्धा मसाला फाट्यावर नेत काठीने आणि तांबीने अमानुष मारहान केल्याचा महिलेने आरोप केला आहे. 'माझ्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. लोक पाहत होती मात्र सोडवायला कोणीच आलं नाही' असही या पीडित महिलेने पोलिसांत सांगितलं.
भर रस्त्यात पतीने गुप्त अंगावर अमानुष मारहाण केली. त्यामुळे महिलेला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना खाली बसता येत नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या जखमी महिलेवर जिल्हा शासकीय रूग्णालय बीड इथं उपचार सुरू आहेत.
6 मे 2006 साली या महिलेचा विवाह रमेश पिंपळे यासोबत झाला होता. गुण्यागोविंदाने चाललेल्या संसारात त्यांना एक मुलगा आहे. मात्र अचानक चारित्र्यच्या संशयावरून विरजन पडलं. संसारात खटके उडाले पतीने अनेक वेळा मारहाण केली असं पतीने पोलिसांत म्हटलं आहे.
या सगळ्यावर कंटाळून मुलाला घेवून माहेरी निघून गेली. त्यानंतर महिलेने 2012 मध्ये रमेशच्या जमिनीवर दावा टाकला होता. 2014 पासून त्या माहेरी राहत असल्याचं सांगत आहेत. गेवराई सत्र न्यायालयात प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात तारखेला आलेल्या पत्नीला रमेशने बोलवून घेतं मिटवून घेवू असं सांगितलं. त्यानंतर गाडीत बसवून गावाकडे घेवून जाताना पत्नीला बेदम मारहाण केली.
दरम्यान, मारहाण करताना अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचं महिलेने पोलिसांत सांगितलं आहे. या बाबतीत महिलेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप महिलेने केला आहे.
भाजप खासदाराने आपल्याच पक्षाच्या आमदाराला बुटाने बडवले, VIDEO व्हायरल