बीड, 21 जून : बीड जिल्ह्यातील सौताडा घाटामध्ये साखरेने भरलेला ट्रक पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. लायक शब्बीर पठाण असं मयत चालकाचं नाव आहे.
रेनापूर शुगर कारखाना अंबाजोगाई येथून पनवेलकडे साखर घेऊन जाताना पाटोदा तालुक्यातील सौताडा घाटामध्ये रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक घाटातून थेट दहा फुट खोल खड्ड्यात पलटी झाला. यावेळी गाडीचा क्लिनर आधीच खाली पडल्यामुळे वाचला. मात्र चालक स्टेअरिंगमध्ये अडकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
चंद्रपुरातही भीषण अपघात
महाराष्ट्रातील अपघातांची मालिका थांबत नसल्याचं दिसत आहे. चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त इर्टिगा गाडीचा टायर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा - गैरकारभाराला ग्रामस्थ वैतागले, रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी
नागपूरवरून चंद्रपूरकडे इर्टिगा गाडीतून काही जण प्रवास करत होते. मात्र गाडी अतिशय वेगात असल्याने चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली इथं या गाडीचा टायर फुटला. त्यानंतर ही गाडी तब्बल 100 फूट घासत पुढे निघून गेली. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.