मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पोरा-पोरींचा धुरळा! Tiktok स्टारच्या वाढदिवसानिमित्त भरला चक्क टिकटॉक मेळावा

पोरा-पोरींचा धुरळा! Tiktok स्टारच्या वाढदिवसानिमित्त भरला चक्क टिकटॉक मेळावा

स्वतःचं टॅलेंट दाखवण्यासाठी गावागावातील कलाकारांनी सध्या टिकटॉकवर एकच धमाल उडवून दिली आहे.

स्वतःचं टॅलेंट दाखवण्यासाठी गावागावातील कलाकारांनी सध्या टिकटॉकवर एकच धमाल उडवून दिली आहे.

स्वतःचं टॅलेंट दाखवण्यासाठी गावागावातील कलाकारांनी सध्या टिकटॉकवर एकच धमाल उडवून दिली आहे.

    सुरेश जाधव, बीड, 8 फेब्रुवारी : अगदी कमी कालावधीत मनोरंजन करणारं टिकटॉक हे अ‍ॅप आता चांगलंच लोकप्रिय झालं आहे. या अ‍ॅपच्या लोकप्रियतेसोबतच त्याच्यावर व्हिडिओ बनवणाऱ्या तरुण-तरुणींनाही चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. विशेष म्हणजे स्वतःचं टॅलेंट दाखवण्यासाठी गावागावातील कलाकारांनी सध्या टिकटॉकवर एकच धमाल उडवून दिली आहे. टिकटॉकवर चांगला नावलौकिक मिळवलेलेली बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार उर्मिला पवार हिचा आज वाढदिवस होता. याच निमित्ताने हजारो टिकटॉक स्टार पुन्हा एकदा परळीत एकत्र आले आणि उर्मिला पवारचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे एका शेतात जमलेली भरगच्च मंडळी पाहून इथे कुठलं साहित्य संमेलन आहे की काय असंच वाटेल. मात्र एका टिकटॉक स्टारच्या वाढदिवसानिमित्त जिरेवाडीच्या शेतात ही गर्दी झाली होती. महाराष्ट्रातील स्टार गावात आल्याचं पाहून, तरुण मुलांनी देखील इथे गर्दी केली. इथं प्रत्येकजण मोबाईल काढून टिकटॉकवर व्हिडिओ बनवत होता. सगळेच कलाकार एकमेकांचे व्हिडिओ काढण्यात दंग झाले होते. घरच्यांनी प्रेमाला नाकारलं, मुलीने मुलाचं घरं गाठलं पण... एखाद्या टिक टॉक स्टारचा असाही वाढदिवस साजरा होतोय, हे पहिल्यांदाच समोर आले. त्यामुळे टिकटॉक स्टार उर्मिला पवार स्वतःच्या वाढदिवसानिमित्त भारावून गेली होती. उर्मिला पवारचे तीन मिलियन फॉलोअर्स आहेत. टिक टॉक सर्वसामान्यापर्यंत जावो. शिवाय बीडच्या एका कलाकाराचा बीडमध्ये सन्मान व्हावा. टिकटॉक कलाकारांना वाव मिळण्यासाठी सरकारने असे मेळावे आयोजित करावे, अशी मागणी चक्क या मेळाव्यानंतर समोर आली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या