Home /News /maharashtra /

भरधाव कारची मोटारसायकलला जोरदार धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

भरधाव कारची मोटारसायकलला जोरदार धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

हा अपघात आज दुपारच्या सुमारास बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील मुळूक चौकामध्ये झाला .

बीड, 15 जून : बी- बियाणे घेवून मोटारसायकलवर गावी परतत असताना कारच्या धडकेत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दुपारच्या सुमारास बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील मुळूक चौकामध्ये झाला . या प्रकरणी लिंबागणेश पोलीसांनी कार चालकास ताब्यात घेतले आहे. बंकट बाबू मोरे ( वय 50 ), संजय बाळू सोनवणे ( वय 45 ), गोरख बबन मोरे ( वय 32) अशी मयतांची नावे आहेत. अपघातात ठार झाले हे शेतकरी दुचाकीवरुन ( एमएच -23 एस -8146 ) बियाणे घेवून त्यांच्या मसेवाडी गावाकडे परतत होते . यावेळी लिंबागणेश परिसरतील मुळूक चौकामध्ये समोरुन भरधाव आलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये बंकट व संजय यांचा जागीच मृत्यू झाला, तर गोरख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी एक मोठा अपघात रविवारी रात्री कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस दुभाजकावर आदळल्याने बसचा अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आनंद बिहारहून दिल्लीतील मुझफ्फरपूरकडे जाताना वळणावर लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर दुभाजकावर बस धडकली. यात तब्बल 24 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत, त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी झालेल्या 3 प्रवाश्यांना कानपूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या