Home /News /maharashtra /

माणुसकीच्या व्याजावर चालणारी संघर्ष बँक, शिक्षकांनी एकत्र येत गरिबांसाठी स्थापन केली मोफत धान्य पुरवणारी बँक

माणुसकीच्या व्याजावर चालणारी संघर्ष बँक, शिक्षकांनी एकत्र येत गरिबांसाठी स्थापन केली मोफत धान्य पुरवणारी बँक

शिक्षकांनी एकत्र येत गरिबांसाठी संघर्ष धान्य बँक सुरू केली.

बीड, 5 सप्टेंबर : पैसे ठेवणाऱ्या, काढणाऱ्या बँका, सोनेतारण ठेवणाऱ्या बँका पहिल्या असतील. या बँका काही ना काही व्याज देखील आकारतात. मात्र माणुसकीच्या व्याजावर चालणारी गरजू गोर गरिबांसह अनाथांना मोफत धान्य पुरवणारी बँक शिक्षकांनी सुरू केली आहे. शिक्षकांनी बीड (Beed) जिल्ह्यात सुरू केलेली संघर्ष धान्य बँक (Sangharsh Food Bank) पाहूयात कशी आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांने प्रेरित होऊन गेवराई तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत संचिता कडून वंचितांकडे हे ब्रीद वाक्य घेऊन अनाथ निराधार गरजू लोकांना धान्य स्वरूपात मदत करता यावी या हेतूने संघर्ष धान्य बँकेची स्थापन केली. गेल्या तीन वर्षात आत्तापर्यंत तब्बल 700 ते 800 क्विंटल धान्य सात अनाथालय आणि शेकडो गरजवंतांना बँकेमार्फत धान्य वाटप केले आहे. या धान्य बँकेच्या तालुक्यात पाच शाखा आहेत. सात संचालक तसेच गेवराई तालुक्यातील 300 शिक्षक सभासद आहेत. तसेच शेकडो दाते बँकेच्या संपर्कात आले आहेत. दान देण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो मात्र ते गरजवंतापर्यंतत पोहचवण्यासाठी वेळ नसतो, माहिती नसते. यासाठी बँक दुवा म्हणून काम करत आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातमध्ये काम करत असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत अन् आतापर्यंत आणि गरजू पर्यंत पोहोचावी यासाठी पुढाकार घेत संघर्ष धान्य बँकेची सुरुवात केली. या माध्यमातून आज गेल्या तीन वर्षापासून आम्ही काम करत आहोत, यामध्ये मोठा आनंद मिळत असून लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेकांचे रोजगार गेले होते यावेळी हातावर पोट असणाऱ्या मजूरांना आम्ही मदत केली असे बँकेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी झेंडेकर यांनी सांगितले. मला दोन जुळे मुले आहेत. त्यांचा प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करताना त्यांच्या वयाच्या वजनाचे धान्य मी स्वतः बँकेत जमा करतो असं त्यांनी सांगितलं. नदीत आंघोळीसाठी गेलेले पाच तरुण बुडाले, नागपुरातील घटना जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संतोक्ती प्रमाणे व संत गाडगे महाराज यांच्या विचाराने प्रभावित होऊन आम्ही सर्व शिक्षकांनी या बँकेची स्थापना केली. यामध्ये कुणाचा वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस पुण्यतिथी या निमित्त शिक्षक मित्रमंडळी धान्य स्वरुपात बँकेत मदत जमा करतात आणि गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो असे धर्मराज करपे यांनी सांगितलं. विशेष गेवराई तालुक्यामध्ये पाच शाखा आहेत मादळमोही, उमापूर, धोंडराई, बंगाली पिंपळा अशा शाखा आहेत. तसेच शेकडो लोक आम्हाला मदत करतात असा देखील त्यांनी सांगितले. संचिता कडून वंचिताकडे हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही संघर्ष सामाजिक बँकेची स्थापना केली. समाजातील अनेक लोकांना दान द्यायचा आहे. मात्र ते कोणाकडे द्यावा गरजवंतांपर्यंत पोहोचेल का? असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर असतात आणि याला उत्तर म्हणून आम्ही या सामाजिक प्रयोगाची सुरुवात केली आहे. बँकेमध्ये आम्ही धान्य स्वरूपातच मदत घेतो एखाद्याला पाच हजार रुपये मदत द्यायची असेल तर पाच हजार रुपयांचा किराणा किंवा धान्य विकत आणून द्यावे असे सांगतो. तसेच प्रत्येक महिन्यातील दोन दिवस आम्ही हे धान्य करू अंतापर्यंत पोहोचवतो यासाठी साथी संचालक एकत्रित येऊन धान्य कुणाला द्यायचं हे ठरवतो असं संजय पांढरे यांनी सांगितलं. RSSचा इन्फोसिसवर गंभीर आरोप; म्हणाले, कंपनीकडून नक्षलवादी, डावे यांना मदत गेवराई शहरात राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण सुरू असलेले सुमेधा सुलाखे तिने संघर्ष सामाजिक धान्य बँकेमार्फत वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने सांगितले की माझा वाढदिवस साजरा करत असताना मित्र मंडळी त्याचबरोबर परिवारातील मंडळी सोबत न साजरा करता कोरोनाचे संकट असल्यामुळे वडिलांनी सांगितले की आपण गरजवंतांना मदत करू. मात्र ती मदत कोणामार्फत करावी त्यावेळी संघर्ष सामाजिक बँकेचे नाव पुढे आले, त्यांच्यामार्फत मी गेवराई शहरातील अंध आणि अपंग व्यक्तींच्या घरी मदत केली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय असा वाढदिवस साजरा झाला सुमेधा सुलाखे सांगितले. गेवराई शहरातील महाडा कॉलनीमधील पत्नी अपंग आणि स्वता अंध असलेल्या कुटुंबात प्रत्येक महिन्याला संघर्ष धान्य बँकेने मदत केली. अपंग असलेल्या या कुटुंबाला आधार मिळाला काम करता येत नाही लॉकडाऊनमुळे सर्व बंद आशा वेळी मदत केली यामुळं दिव्यांग दांपत्याने सांगितलं. गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेल्या शिवाजी झेंडेकर, संजय पांढरे, सुरेश भोपळे, धर्मराज करपे, सुभाष काळे, बाळासाहेब गावडे, सुरेश नवले या सात जणांनी मिळून या चांगल्या कामाची सुरुवात केली. शिक्षकांनी सुरू केलेल्या धान्य बँकेचे सर्वत्र कौतुक केले जात असून जात असून कोरोना च्या संकटात गोरगरीब गरजूंसाठी संघर्ष धान्य बँक ही आधार ठरली आहे. आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या बीड जिल्ह्यामात्र माणुसकीच्या दृष्टीने श्रीमंत आहे. महापूर,अतिवृष्टी, झालेल्या भागात देखील बिडकर आणि मदतीचा हात दिला होता. यामुळे माणुसकीचे श्रीमंती असलेली शिक्षकांची संघर्ष सामाजिक धान्य बँक आदर्श ठरत आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed

पुढील बातम्या