Home /News /maharashtra /

बीड एसटी बस अपघाताची धक्कादायक माहिती समोर, चालकाचे मेडिकल केलेच नव्हते!

बीड एसटी बस अपघाताची धक्कादायक माहिती समोर, चालकाचे मेडिकल केलेच नव्हते!

'एसटीचा चालक 30 दिवसांपेक्षा जास्त कामावर नसेल तर तो चालक जेव्हा कामावर हजर होईल, तेव्हा त्याला मेडिकल चाचणीतून जावे लागते

'एसटीचा चालक 30 दिवसांपेक्षा जास्त कामावर नसेल तर तो चालक जेव्हा कामावर हजर होईल, तेव्हा त्याला मेडिकल चाचणीतून जावे लागते

'एसटीचा चालक 30 दिवसांपेक्षा जास्त कामावर नसेल तर तो चालक जेव्हा कामावर हजर होईल, तेव्हा त्याला मेडिकल चाचणीतून जावे लागते

औरंगाबाद, 10 जानेवारी : एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी कामगार परतले असून एसटी बस सुरू झाली आहे. पण, अशातच बीड जिल्ह्यात (ST bus major accident in Beed) रविवारी एसटी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांना आपला जीव गमाववा लागला. यामध्ये एसटीचे कर्मचारी मयत झाले. news18 लोकमतने या बातमीचा पाठलाग करीत सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. औरंगाबाद आगर 1 मधून MH-20-BL-3017 ही गाडी लातूरकडे रवाना झाली. चालक म्हणून जखमी सुभाष गायकवाड बिल्ला क्रमांक 25049 आणि वाहक म्हणून चंद्रकांत पाटील जे दुर्दैवाने या अपघातात मयत झाले. तर अपघातातून बचवलेले चालक सुभाष गायकवाड यांनी दिलेली प्रतिक्रिया धक्कादायक आहे. (नागपुरातील 'या' राष्ट्रीय संस्थेत तब्बल 42,000 रुपये पगाराची नोकरी; इथे करा अर्ज) 'एसटीचा चालक 30 दिवसांपेक्षा जास्त कामावर नसेल तर तो चालक जेव्हा कामावर हजर होईल, तेव्हा त्याला मेडिकल चाचणीतून जावे लागते. मेडिकल प्रमाणपत्र असल्याशिवाय त्याला कामावर हजर करून घेतले जात नाही. मात्र अपघातग्रस्त गाडीचे चालक गेल्या अडीच महिन्यांपासून कामावर नव्हते मग त्यांची मेडिकल चाचणी का केली गेली नाही? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. चालक सुभाष गायकवाड यांना  मेडिकल प्रमाणपत्र शिवाय गाडी कशी चालवायची परवानगी दिली. सुभाष गायकवाड यांना लांब पाल्याची एसटी चालवण्याचा अनुभव नसतांना का लातूर ला पाठवले. सुभाष गायकवाड शहरात डेपो ते st बसस्थानक समान घेऊन जाणाऱ्या एसटी ट्रॅकचे चालक मग त्यांना st चालवण्यास कुणी दिली, असा सवाल कामगारांनी उपस्थितीत केला आहे अपघातात 6 जणांचा मृत्यू दरम्यान, रविवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात ६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला होता.  अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की, जागीच चार जणांचा मृत्यू झाला आहे मृतांची संख्या ६ वर पोहोचली आहे. (अविश्वसनीय VIDEO! माणसांसमोर जंगलाचा राजा सिंह थरथर कापू लागला, पाहताच ठोकली धूम) अपघातानंतर दोन्ही गाड्यांचा चेंदामेंदा झाला. एसटी बसमध्ये प्रवासी आणि एसटी चालक अडकला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी चक्क क्रेन बोलवावा लागला. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजुला करुन आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि एसटी चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या