मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात शिवसैनिकांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

बीडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात शिवसैनिकांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात शिवसैनिकांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात शिवसैनिकांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे असं काही दिसत नाहीये. अनेकदा महाविकास आघाडीतील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक पातळीवर वारंवार तिन्ही पक्षांतील नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याच्या घटना समोर येताना दिसून येतात.

बीड, 13 फेब्रुवारी : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बीडमध्ये (Beed) पुन्हा एकदा बिघाडी झाली असल्याचं दिसून येत आहे. शिवसैनिकांनी (Shivsainik) आणलेले कामं स्थानिक आमदार संदीप क्षिरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांनी अडवल्याने त्यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. बीड मतदारसंघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेले विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. ही अन्यायकारक वर्तवणुक मी सहन करनार नाही, सदर अडवलेली कामे तात्काळ शिवसेनेला द्यावेत. अशी मागणी वजा तक्रार शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी शिवसेना नेत्यांकडे केली आहे.

बीड तालुक्यातील चऱ्हाटा व पालवण गावाला जोडणाऱ्या पुलांना मंजूरी मिळावी म्हणून आमदार अंबादास दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. सदर विनंती मान्य करून विशेष बाब म्हणून फेब्रुवारी 2022 च्या अर्थसंकल्पात या कामांना समाविष्ट करून मंजूरी दिली. ही कामे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. आम्ही त्यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी अडवणूक सुरू केल्याने, नाईलाजास्तव आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करावा लागला. अन्यायकारक बाबी मी तर सहन करनार नाही. सदरील कामा बाबत संबंधित यंत्रणांना आदेशित करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांकडे केली आहे.

वाचा : काँग्रेसने काढला वचपा; राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक गळाला

दरम्यान यामुळे बीडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या अगोदरही शिवसैनिकांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवून, काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला होता. त्यामुळे आता या कामाचं राजकारण पुढे काय रंग घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध

स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आम्ही आणलेल्या कामावर डल्ला मारत आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी विशेष कामं म्हणून या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र स्थानिक आमदार हे काम करताना आडकाठी आणत आहेत असं म्हणत शिवसैनिक 8 फेब्रुवारी रोजी बीडमध्ये रस्त्यावर उतरले. त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच प्रचंड घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून या विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याचा निषेध नोंदवला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवून, अजित दादा तुमच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आघाडीचा धर्म शिकवा असं म्हणत बॅनर आणि घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काळे झेंडे घेऊन हे शिवसैनिक रस्त्यावर आले होते.

First published:

Tags: Beed, NCP, काँग्रेस