• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बीडमध्ये प्रवाशांकडून रेल्वे कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
  • VIDEO: बीडमध्ये प्रवाशांकडून रेल्वे कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 01:32 PM IST | Updated On: Jul 24, 2019 01:32 PM IST

    बीड, 24 जुलै: परळी रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून चौकशी कक्षातील कंत्राटी कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली. मध्यरात्री 12 च्या दरम्यान झालेली मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही मारहाण सोडवण्यासाठी रेल्वे पोलीस का आले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव करण बलभीम कांबळे असं आहे. तो परळी रेल्वे स्टेशनमधील चौकशी विभागात काम करतो. याप्रकरणी परळी पोलिसांत अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कर्मचारी आणि प्रवाश्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading