बीड, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आज राज्यभरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनीही परळी शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र हा कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर चांगलाच गोंधळ उडाला.
परळी शहरात मोंढा मैदानावर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 81 किलोचा केक सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व सिने अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते कापण्यात आला. मात्र या कार्यक्रमानंतर केक खाण्यावरून स्टेजवरच मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला.
तरुणांनी केक खाण्यासाठी धाव घेतली तर बच्चे कंपनीकडून एकमेकांवर केकचा मारा सुरू झाला. या सर्व प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल आता चांगलाच व्हायरल होत आहे.
#Beed VIDEO : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राडा, केक खाण्यासाठी स्टेजवर उडाली झुंबड pic.twitter.com/RpLcUPbVI2
— News18Lokmat (@News18lokmat) December 12, 2020
दरम्यान, कार्यक्रम गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना सौम्या लाठीचार्ज करावा लागला.