बदली झाल्यानंतर निरोप समारंभ झाला...मात्र जाताना पोलिसासोबत वाटेतच घडली विपरीत घटना

बदली झाल्यानंतर निरोप समारंभ झाला...मात्र जाताना पोलिसासोबत वाटेतच घडली विपरीत घटना

निरोप समारंभानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या झालेल्या अपघाती मृत्यूनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

बीड, 13 सप्टेंबर : बीड पोलीस दलातील पो.ह.महेश आधटराव, यांची नेकनूर येथून गेवराई येथे बदली झाल्याने काल रात्री निरोप समारंभ झाला. त्यानंतर महेश आधटराव हे नेकनूर इथून बीडला येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला आणि त्यात महेश यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

निरोप समारंभानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या झालेल्या अपघाती मृत्यूनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. महेश आधटराव यांनी 15 वर्ष उल्लेखनीय सेवा दिली. या सेवेमध्ये त्यांना 66 बक्षीस प्राप्त आहेत. त्यांनी कर्तव्यदक्षतेने काम करताना सामाजिक कार्याची आवड जोपासली होती.

नुकतंच लॉकडाउन कालावधीत त्यांनी लिंबागणेश गावात वादळी वाऱ्यामुळे उडालेले वृद्ध दाम्पत्याचे घर पूर्ववत करून देऊन खाकीतील माणुसकी दाखवली होती. या बीड पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचं अकाली निघून जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं.

दुसरीकडे, बीडमध्ये आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. लॉकडाऊनमुळे शाळा-कॉलेज, महाविद्यालय बंद आहेत. यातच शेतकऱ्याची मुले शेतामध्ये शेतकरी बापाला मदत करत आहेत. मात्र अशाच मदत करणाऱ्या 17 वर्षीय मुलाचा कांद्याचे रोप आणण्यासाठी रिक्षाने जाताना अपघात दुर्दैवी मृत्यू झाला. शाळा सुरू असती तर माझा मुलगा वाचला असता असा टाहो मुलाच्या आई-वडिलांनी फोडला आहे.

ही हृदयद्रावक घटना बीड तालुक्यातील मौजवाडी गावात घडली आहे. 17 वर्षीय निलेश परमेश्वर बन्सड हा शाळा बंद असल्याने वडिलांना शेती कामात मदत करत होता. त्यातच कांद्याच्या लागवडीसाठी रोपे घेऊन येतो म्हणून मित्राच्या रिक्षात गावाकडून वडवणीकडे जात असताना रस्त्यातच रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात निलेशचा जागीच मृत्यू झाला.

Published by: Akshay Shitole
First published: September 13, 2020, 11:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading