सुरेश जाधव, बीड, 25 जानेवारी : विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीसाठी एक लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटाची राष्ट्रीय फिल्म फेअर शॉट फिल्म अवार्डसाठी निवड करण्यात आली आहे. तसंच देशभरात हा लघुपट आदर्श म्हणून पाहिला जाणार आहे. ही गोष्ट बीड पोलिसांसाठी आभिमानास्पद आहे, अशी भावना बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी व्यक्त केली आहे.
बीड पोलिसांच्या या लघुपटाला यापूर्वी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सावात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. या लघुपटात पोलीस दलातील कर्मचारी तसेच स्थानिक कलाकारांनी अभिनय केला होता. या लघुपटास ‘आम्ही दक्ष मतदारांचा पक्ष’ असे नाव देण्यात आले होते. लघुपटाचे दिग्दर्शन आरती बागडी यांनी केले आहे.
'मतदारांनी कोणत्याही अमिषाला आणि भीतीला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा. कुठेही अडचण आली तर बीड पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार आहे,' असा संदेश देणाऱ्या ‘आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष’ या लघुपटाची निर्मिती बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून करण्यात आली होती. यामध्ये सर्व कलाकार हे बीड पोलीस दल आणी ग्रामीण भागातील आहेत.
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्याप्रकरणी आरोपी निर्दोष
या लघुपटाचे दिग्दर्शन मुंबई येथील आरती बागडी यांनी केले. तर लेखन वर्षा खरीदहा यांनी केले. ताडसोन्ना आणि बीड येथील स्थानिक कलाकार सोहम सवई, दिपाली रुईकर, रंजित वाघमारे, महादेव सवई, पोलीस कर्मचारी अनिल शेळके आणि इतर कर्मचाऱ्यांनी भूमिका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed police