सुरेश जाधव, बीड, 29 जानेवारी : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदारासह खाजगी व्यक्तीस रंगेहाथ पकडले आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तहसील पारिसरात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.
गेरवाईतील कारवाई महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. गेवराई येथील नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे आणि इसम माजीद शेख असे पकडलेल्या लाचखोरांची नावे आहेत. अवैध वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर सोडण्यासाठी तक्रारदारास 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. गेवराई तहसील परिसरात पोलिसांनी सापळा रचत दोघांनाही रंगेहाथ पकडले.
हेही वाचाएक चूक झाली आणि अख्खं कुटुंब गमावलं, डोळ्यासमोरच मुलगा, मुलगी आणि पत्नी ठार
ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी आरोपींवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचासरांच्या प्रश्नांना कशाल उत्तरं देतो म्हणत वर्गमित्रांनी केली हुशार विद्यार्थ्याला मारहाण
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचं लोकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तसंच जिल्ह्यात इतर काही ठिकाणीही असेच प्रकार होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गेवराईप्रमाणेच इतर ठिकाणी होणारी अवैध वाळू वाहतूक आणि तिला पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.