Home /News /maharashtra /

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियात पोस्ट करणं पडलं महागात, बीडच्या तरुणाला बेड्या

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियात पोस्ट करणं पडलं महागात, बीडच्या तरुणाला बेड्या

Beed youth arrested: गुजरातच्या मुख्यमंत्र्याविरोधात बीडमधील एका तरुणाने पोस्ट केली होती.

बीड, 31 जुलै : गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियात (Social Media) एक पोस्ट केल्याप्रकरणी बीडच्या तरुणाला अटक (Beed youth arrest) करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील शिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 20 वर्षीय तरुणाला गुजरात सायबर पोलिसांनी नोटीस बजावत अटक केली आहे. फैसल खान युसूफझाई असं त्या तरुणाचं नाव आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी (Gujarat CM Vijay Rupani) यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणीची पोस्ट फैसल याने 15 महिन्यांपूर्वी केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर रूपाणी यांनी 2020 मध्ये कोविड पॉझिटिव्ह चाचणी केल्याचा खोटा दावा 15 एप्रिल 2020 च्या पोस्टमध्ये केल्याचा आरोपही फैसलवर करण्यात आला आहे. 'शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिकच राहते' राऊतांचा नारायण राणेंना टोला या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहमदाबाद शहरातील सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के.के मोदी यांनी सिरसाळा येथील मोबाईल शॉपचा मालक फैसल खान युसूफझाई या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली होती. 18 एप्रिल 2020 रोजी फैसलवर कलम 505 (1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर आता याप्रकरणी 15 महिन्यानंतर अहमदाबाद सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपी फैसलला नोटीस बाजावत अटक केली आहे. त्यामुळे सोशल मीडियात कुठलीही पोस्ट करत असताना योग्य ती माहिती आणि आक्षेपार्ह किंवा कुणाही व्यक्तीसाठी अपमानास्पद असेल अशा पोस्ट करु नका.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, Crime, Gujarat

पुढील बातम्या