धनंजय मुंडेंविरोधात पंकजा उतरल्या मैदानात, गंभीर आरोपांसह केली घणाघाती टीका

धनंजय मुंडेंविरोधात पंकजा उतरल्या मैदानात, गंभीर आरोपांसह केली घणाघाती टीका

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका (BJP Pankaja Munde Criticizes NCP Dhananjay Munde) केली आहे.

  • Share this:

बीड, 16 एप्रिल : बीड जिल्ह्यात (Beed Ditrict) कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका (BJP Pankaja Munde Criticizes NCP Dhananjay Munde) करत थेट आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

'बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना आणि पालकमंत्री यांना फक्त माफियांचं हित माहीत आहे,' असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्य सरकारने बीडला केवळ 20 डोस दिले आहेत, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक झाली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 729 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर बाधितांची संख्या 35 हजाराच्या आसपास गेली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रूग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रूग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

हेही वाचा - राम कदमांना घराबाहेर पाऊल ठेवण्यास मनाई, मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रूग्णसंख्या वाढीत भर पडत आहे. असं असताना जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र फक्त माफियांना मदत करत आहेत, त्यांना लोकांशी देणे घेणे नाही असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आलेल्या 2 लाख डोसेस पैकी बीडला इतर जिल्ह्याच्या तुलनेत केवळ 20 लसी मिळाल्या आहेत, ही अतिशय खेदजनक बाब असून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेसे डोसेस आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: April 16, 2021, 12:34 PM IST

ताज्या बातम्या