मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed News : रुग्णांची वणवण सहन झाली नाही, उद्योजक तरुणाने उभारले 50 बेडचे कोविड सेंटर

Beed News : रुग्णांची वणवण सहन झाली नाही, उद्योजक तरुणाने उभारले 50 बेडचे कोविड सेंटर

Beed Ashti Covid Center गावातील आणि तालुक्यातील रुग्णांचे बेड मिळत नसल्याने होणारे हाल पाहून सागर आमले या उद्योजक तरुणानं 50 बेडचं कोविड सेंट्र सुरू करत, या संकटात रुग्णांना मोठा आधार दिला आहे.

Beed Ashti Covid Center गावातील आणि तालुक्यातील रुग्णांचे बेड मिळत नसल्याने होणारे हाल पाहून सागर आमले या उद्योजक तरुणानं 50 बेडचं कोविड सेंट्र सुरू करत, या संकटात रुग्णांना मोठा आधार दिला आहे.

Beed Ashti Covid Center गावातील आणि तालुक्यातील रुग्णांचे बेड मिळत नसल्याने होणारे हाल पाहून सागर आमले या उद्योजक तरुणानं 50 बेडचं कोविड सेंट्र सुरू करत, या संकटात रुग्णांना मोठा आधार दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

बीड, 10 मे : कोरोना रुग्णांची स्थिती (coronavirus) राज्यात काहीशी कमी होत असली तरी काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांना बेड (Bed Shortage) मिळत नसल्याचं समोर आलं. बीड जिल्ह्यातही (Deed District) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रचंड गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र एका तरुण उद्योजकाने (Young Business) संकटाशी सामना करताना खारीचा वाटा म्हणून, एका मंगल कार्यालयात 50 बेडचं कोविड सेंटर (50 Bed Covid Center) सुरू केलं आहे.

(वाचा-कोरोनाकाळ आणि लग्नही जमत नाही! मानसिकरित्या खचलेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल)

बीडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लक्षणे असलेल्या काही रुग्णांनाही बेडअभावी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याची वेळ आली आहे. पण त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कुटुंबामध्ये आणि परिणामी समाजात पसरण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल आणि फरफट होत असल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आष्टी येथील एका तरुण उद्योजकाने पुढाकार घेतला. सागर आमले असं त्याचं नाव असून त्यानं कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी 50 खाटांचं कोविड सेंटर उभारलं आहे.

सागर आमले हा तरुण आष्टी तालुक्यामधल्या कडा इथं राहणारा आहे. त्याच्या तालुक्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळं रुग्णसंख्या वाढली. पण बेड मिळवण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचं त्यानं पाहिलं. त्यामुळं यावर काय उपाय असा विचार करताना त्याच्या मनात कोविड सेंटर उभारण्याचा विचार आला. मग काय त्यानं यासाठी लगेचच प्रयत्न सुरू केले आणि आता त्याचं 50 बेडचं उत्तम असं कोविड सेंटर तयार आहे.

(वाचा-कोरोना विषाणूच्या निर्मितीसाठी 6 वर्षापासून सुरू होता चीनचा प्लॅन? वाचा कारण)

सागर याने एका मंगल कार्यालयामध्ये त्याचं कोविड सेंटर उभारलं आहे. या मंगल कार्यालयात त्यानं 50 बेडची सुविधा केली आहे. या मध्ये त्यानं 15 बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही केली आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावल्यास त्याला त्वरित उपचार मिळावे याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी 24 चास वैद्यकीय कर्मचारी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे अगदी मोफत या सर्व सुविधा या तरुणाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

कोरोनाच्या या संकटकाळात आपण सर्वांनी एक होऊन संकटाचा सामना करणं गरजेचं आहे. प्रत्येक तालुक्यातील लहान मोठ्या उद्योजक व्यापाऱ्यांनी सागर सारखा पुढाकार घेतल्यास या संकटाची जास्त झळ सामन्यांना बसणार नाही आणि समाजासाठी काहीतरी केल्याचं मोठं समाधान मिळू शकेल.

First published:

Tags: Beed news, Coronavirus