मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed: घरातील चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, एकाच दिवशी गमावल्या 8 आणि 9 वर्षांच्या दोन्ही मुली

Beed: घरातील चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, एकाच दिवशी गमावल्या 8 आणि 9 वर्षांच्या दोन्ही मुली

हसतं-खेळतं कुटुंब एखाद्या घटनेमुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. असाच काहीसा प्रकार बीडमधील कोरडे कुटुंबासोबत घडला आहे.

बीड, 28 ऑगस्ट: हसतं-खेळतं कुटुंब एखाद्या घटनेमुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. असाच काहीसा प्रकार बीडमधील कोरडे कुटुंबासोबत घडला आहे. या घरातील दोन चिमुरड्यांच्या किलबिलाटाचा करुण अंत झाल्याची घटना घडली आहे. अवघ्या 8 आणि 9 वर्षांच्या मुलींचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मुली त्यांच्या आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला.

कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी ही घटना घडली. नेहा धर्मराज कोरडे (वय 9 वर्ष) आणि अमृता धर्मराज कोरडे (वय 8 वर्ष) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले. तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. कोरडे कुटुंबावर ओढावलेल्या या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचा-VIDEO: छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी, अपहरणाचा संशय

गेवराई नदीपात्रात यापूर्वीदेखील कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात बुडन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यापुर्वी देखील मिरगाव, संगमजळगाव येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यातच शनिवारी राक्षसभुवन याठिकाणी घडलेल्या या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अशाप्रकारे घटना टाळण्यासाठी नदीपात्राजवळ असताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Beed, Beed news