Father's day ला बीडमध्ये संतापजनक घटना, मुलाने जन्मदात्यांना काठीने बेदम मारले, आईने सोडला जीव,VIDEO

मारहाण करताना थांबवण्यासाठी केलेल्या लोकांना देखील शिव्या आणि मारहाण करत होता म्हणून लोकं तिकडे जात नव्हते.

मारहाण करताना थांबवण्यासाठी केलेल्या लोकांना देखील शिव्या आणि मारहाण करत होता म्हणून लोकं तिकडे जात नव्हते.

  • Share this:
बीड, 20 जून: वडिलांचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून फादर्स डे (father's day) संपूर्ण देशभरात साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र बीडमधील (Beed) घाटशिळ पारगाव येथे मुलगा आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गंभीर बाब म्हणजे, या बेदम मारहाणीत जन्मदात्या आईचा मृत्यू झाला असून वडील नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान काठीने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, मारहाण करत असतानाचा व्हिडिओ गावातीलच एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भाने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सतत मारहाण करत होता, असे  काही ग्रामस्थांनी सांगितले. त्याला मारहाण करताना थांबवण्यासाठी केलेल्या लोकांना देखील शिव्या आणि  मारहाण करत होता म्हणून लोकं तिकडे जात नव्हते. शनिवारी झालेल्या मारहाणीत बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर हिचा मृत्यू झाला आहे. तर वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅप्टननं दाखवला अश्विन-जडेजावर विश्वास, विराटनं सांगितलं खेळवण्याचं कारण आज जागतिक फादर्स डे निमित्त देशभरात वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. आई- वडिलांना काठीने मारहाण करताना मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात  बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना विचारले असता ते म्हणाले की, 'व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओ ची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार संतापजनक आहे.' आई-वडिलांना अशा पद्धतीने अमानुष मारहा करणाऱ्या नराधमांवर कारवाई करा, अशी मागणी सर्व स्तरातून केले जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने चिंता व्यक्त केली जात आहे. वयोवृद्ध आई-वडिलांना लाठी काठीने बेदम मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published: