मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीडकरानो, असं असता का? अंध मुलांच्या आईचे कोरोनाने निधन झाले अन् शेजाऱ्यांनी दार लावून घेतली

बीडकरानो, असं असता का? अंध मुलांच्या आईचे कोरोनाने निधन झाले अन् शेजाऱ्यांनी दार लावून घेतली

शिरूर कासार तालुक्यातील वारणी गावचे लक्ष्मण धोत्रे यांना चार मुले आणि एक मुलगी असे सर्वच दिव्यांग आहेत, मुलांची लग्न झाली पण त्यांच्या सुना देखील दिव्यांग आहेत.

शिरूर कासार तालुक्यातील वारणी गावचे लक्ष्मण धोत्रे यांना चार मुले आणि एक मुलगी असे सर्वच दिव्यांग आहेत, मुलांची लग्न झाली पण त्यांच्या सुना देखील दिव्यांग आहेत.

शिरूर कासार तालुक्यातील वारणी गावचे लक्ष्मण धोत्रे यांना चार मुले आणि एक मुलगी असे सर्वच दिव्यांग आहेत, मुलांची लग्न झाली पण त्यांच्या सुना देखील दिव्यांग आहेत.

बीड, 19 मे: कोरोनाने (Corona) खरंच माणुसकी शिल्लक आहे असा प्रश्न ही बातमी ऐकून उपस्थित होईल. बीडच्या (Beed) वारणी गावातील संपूर्ण अंध, दिव्यांग धोत्रे कुटुंबाच्या आधार असलेल्या आईचे कोरोनाने निधन झाले. अंत्यविधी प्रशासनाने केला मात्र अंत्यविधी करून गावात आल्यावर गावातील लोकांनी या कुटुंबाला अक्षरशः वाळीत टाकल्यासारखे वागणूक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.घरात दुःखद प्रसंग असताना शेजाऱ्यांनी घराची दारे लावून घेतली, गावातील हातपंपाची चैन काही खोडसाळ व्यक्तीनी काढून नेली, शेजारच्या बोरवाल्याने पाणी देण्यास नकार दिला. यामुळे दोन दिवस या अंध आणि दिव्यांग भावा-बहिणींना पाण्याविना काढावे लागले. 'आम्हाला आधाराशिवाय दुसरीकडून पाणी आणता आले नाही', असं सांगताना डोळ्यात पाणी तरळले.

शिरूर कासार तालुक्यातील वारणी गावचे लक्ष्मण धोत्रे यांना चार मुले आणि एक मुलगी असे सर्वच दिव्यांग आहेत, मुलांची लग्न झाली पण त्यांच्या सुना देखील दिव्यांग आहेत. घरात या कुटुंबाच्या पालन पोषण करणाऱ्या 55 वर्षीय दिव्यांग मुलाच्या आईचा 11 मे रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी बीडला दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नियमाप्रमाणे प्रशासनाने अंत्यसंस्कार केले. मात्र अंत्यसंस्कार करून आल्यावर गावातील लोकांनी या दिव्यांग कुटुंबाला दिलेली वागणूक ऐकली तर अंगावर काटा फुटेल.

बारामती पोलिसांनी केला फिल्मी स्टाइल पाठलाग; थरार नाट्यानंतर ट्रकचालक अखेर गजाआड

दिव्यांगाची आधार असलेली 55 वर्षाची आई निघून गेल्यानंतर या चारही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना समाजाने दिलेली वागणूक चीड आणणारी आहे. घराजवळ आल्यावर साधी विचारपूस देखील केली नाही. भीतीने घराची दार लावले, विचारपूस तर सोडा पाणी सुद्धा भरू दिले नाही. सार्वजनिक शाळेच्या हातपंपाची साखळी खोडसाळपणा करून काढून नेली. यामुळे या कुटुंबाला दोन दिवस पाण्याविना राहावे लागले.

कोरोना संसर्ग झाल्याच्या भीतीनं प्यायला रॉकेल; चाचणीत झाला वेगळाच खुलासा

तर अंत्यविधी करून आल्यानंतर आंघोळ देखील करता आली नाही. शेवटी सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट यांना फोन केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष अंध कुटुंबाला भेट दिली. तसंच शेजारांच्यासोबत भांडून त्यांच्या घरात पाणी भरून दिले. नंतर तहसील प्रशासनाने ग्रामपंचायत यांना सांगून सार्वजनिक हातपंप दुरुस्त करून घेतला. मात्र या कुटुंबाला जी वागणूक दिली ती माणुसकी जिवंत आहे का असा प्रश्न उपस्थित करणारे आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासन यामधील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

First published:

Tags: Beed, Beed news, Corona, Covid-19, Maharashtra