बीड, 02 मार्च: बीड-जालना महामार्गावर असलेल्या कापसाच्या वेअर हाऊसला (Cotton Warehouse Fire at Beed) लागलेल्या भीषण आगीत तब्बल 75 कोटी रुपयांचा कापूस आणि गठाणी जळून भस्म झाल्या आहेत. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग दहा तासांनंतर सुद्धा आटोक्यात आली नव्हती (साधारण 10 वाजण्याच्या सुमारास). रात्री बारा वाजल्यापासून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत. बीड पासून जवळच असलेल्या जप्ती पारगाव परिसरात शासकीय वेअर हाऊस आहे. या ठिकाणी शासनाने खरेदी केलेल्या तब्बल 21 हजार पेक्षा जास्त कापूस गठाणी आणि खाजगी व्यापाऱ्यांच्या सहा ते सात हजार कापूस गठाणी होत्या. ज्याचा बाजारभाव साधारण 75 कोटींच्या आसपास आहे .
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान आग एवढी भीषण होती की जिल्ह्यातील चाळीस पेक्षा जास्त अग्निशमन विभागाचे बंब या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
(हे वाचा-सर्वसामान्यांना मोठा दिलासा, वीज कनेक्शन तोडणार नाही, अजित पवारांची घोषणा)
पाहा व्हिडीओ
(हे वाचा-शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे खळबळ, 120 विद्यार्थी क्वारंटाइन)
दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पोस्ट केला जात आहे. या व्हिडीओतूनच आगीची भीषणता कळून येते आहे. धुराचे लोट पार आसमंतात गेले आहे. आता हे 75 कोटींचे नुकसान कसं भरून निघणार हा सवाल मात्र कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.