गरिबांचं धान्य चोरण्याचा डाव हुकला, काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; धान्याची 610 पोती जप्त

कोरोना काळात काळाबाजाराच्या (Black Market) विविध घटना समोर येत आहेत. सामान्यांना लुबाडण्याची एकही संधी काही समाजकंटकांकडून सोडली जात नाही आहे. बीड जिल्ह्यातही (Beed News) असाच काहीसा प्रकार घडला आहे

कोरोना काळात काळाबाजाराच्या (Black Market) विविध घटना समोर येत आहेत. सामान्यांना लुबाडण्याची एकही संधी काही समाजकंटकांकडून सोडली जात नाही आहे. बीड जिल्ह्यातही (Beed News) असाच काहीसा प्रकार घडला आहे

  • Share this:
बीड, 19 जून: कोरोना काळात काळाबाजाराच्या (Black Market) विविध घटना समोर येत आहेत. सामान्यांना लुबाडण्याची एकही संधी काही समाजकंटकांकडून सोडली जात नाही आहे. बीड जिल्ह्यातही (Beed News) असाच काहीसा प्रकार घडला आहे. बीडच्या माजलगावात रेशन धान्याचा काळाबाजार करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आलंय. यात जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये  610 पोती गहू आणि तांदळाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. माजलगाव शहरातील बायपासजवळ असणाऱ्या आझाद नगरमध्ये पोलिसांनी धाड टाकून हा साठा पकडला. माजलगाव शहरांमध्ये स्वस्त धान्य काळाबाजारात विकणारे रॅकेट सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धाड टाकताना पोलिसांनी शेकडो पोती भरलेल्या टेम्पोचा पाठलाग केला, त्यावेळी साठ्याची झाडाझडती करण्यात आली. यावेळी 610 पोती जप्त करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये महसूलच्या बड्या अधिकाऱ्यांचा हात असल्याची चर्चा देखील माजलगावात आहे. माजलगावमध्ये अनाधिकृत स्वस्त धान्याचे आणखी साठे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. हे वाचा-शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा तुफान राडा, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी माजलगावात पोलिसांनी जप्त केलेला साठा रेशनचाच आहे का यासंदर्भात सॅम्पल लॅबला पाठवण्यात आले आहेत. अद्याप याबाबत अहवाल मिळाला नसला तरी हा साठा रेशनमधील असल्याचा प्रथमदर्शी अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले हे वाचा-महत्त्वाची सूचना! सरकारने जारी केले नियम, 30 जूनपूर्वी हे काम करणं अनिवार्य... लॉकडाऊन मध्ये गोरगरिबांना रेशनच्या धान्य आधार आहे. मात्र रेशनच्या धान्याला काळ्या बाजाराची कीड लागल्याने गोर गरीबांना धान्याला मुकावे लागत आहे. रेशनचे धान्य वाटप करत असताना त्रुटी काढून तसेच अंगठा लागत नाही म्हणून बऱ्याच जणांना परत पाठवलं जात असल्याची घटनाही इथे घडतेय. दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदार आणि पुरवठा अधिकारी यांच्या संगनमताने शेकडो क्विंंटलचा काळाबाजार केल्याचे आरोपही केले जात आहे. सामान्यांनी असे आरोप करत यावर कारवाई का होत नाहीत असा सवाल उपस्थित केला आहे, शिवाय त्यांना महसूल विभागाकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची माहिती आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्यांना धान्य तरी वेळेत मिळावं अशी अपेक्षा असताना वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे तसं होत नसल्याचं माजलगाव मधील नागरिक सांगतात.
Published by:Janhavi Bhatkar
First published: