मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खळबळ, परळीत बोगस मतदानाचा प्रकार समोर

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खळबळ, परळीत बोगस मतदानाचा प्रकार समोर

या प्रकरणी  निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

बीड, 20 मार्च : बीड जिल्हा बँकेच्या (Beed District Bank elections) आज आठ जागांसाठी आज मतदान होत आहे. मात्र, परळीमध्ये (Parli) बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदाराचे आधीच मतदान झाले असल्याची नोंद झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली आहे. सर्वत्र शांतेत मतदान सुरू आहे. मात्र परळीत बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला. वैद्यनाथ सहकारी औद्योगिक संस्था येथील केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तब्बल 23 लाखांहून कोरोना लशीचे डोस वाया, का आणि कसे?

सुधाकर प्रभाकर फड यांनी मतदान न करता मतदान झाले कसे असा सवाल उपस्थितीत केला आहे. या प्रकरणी  निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.  बोगस मतदान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परळी हा राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या शाब्दिक युद्ध!

दरम्यान, या निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली.

'सहकार मंत्र्यांनी यांनी जिल्हा बँक संदर्भात जो निर्णय दिला. त्यानिर्णया विरोधात माजी मंत्री हाय कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. हायकोर्टाने सहकार मंत्र्यांना दिलेला निर्णय कायम ठेवला. हायकोर्टाने दिलेला निर्णय भाजपाच्या माजी मंत्र्यांना मात्र मान्य झालं नाही. भाजपाकडे मतदार जास्त असताना देखील बहिष्कार टाकणं म्हणजे, यांचे मतदार यांचं ऐकत नाहीत, अशी स्थिती दिसून येत आहे. तसंच 21 तारखेला निकालाच्या दिवशी जी नामुष्की ओढवणार होती. ती थोडीशी अब्रू वाचविण्यासाठी भाजपने पळपुटेपणापणा केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

First published:
top videos

    Tags: Bank, Beed news, Dhananjay munde, Maharashtra