काटेरी झुडपात नवजात अर्भकाला टाकून आई-वडील फरार, परळी शहरातील धक्कादायक प्रकार

काटेरी झुडपात नवजात अर्भकाला टाकून आई-वडील फरार, परळी शहरातील धक्कादायक प्रकार

पोटच्या बाळाला काट्यात टाकताना जन्मदात्यांचा हात थरथरला नाही का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

  • Share this:

बीड, 24 फेब्रुवारी : काटेरी झुडपात नवजात अर्भकाला टाकून माता पिता फरार झाल्याची धक्कादायक घटना परळी शहरात घडली आहे. परळी शहरातील बरकतनगर परिसरात रेल्वे ट्रॅकशेजारी आज सायंकाळच्या सुमारास एक दिवसाचे स्त्री जातीचे एक अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

बरकतनगर परिसरात रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकाच्या दृष्टीस हे अर्भक पडले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी अर्भक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी तपासले असताना अर्भक हे स्त्री जातीचे असून काही तासांपूर्वीच त्याचा जन्म झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

फेकल्यामुळे बाळाच्या अंगात काटे रुतले असल्यामुळे प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परळी शहरात एकच खळबळ उडाली असून अद्याप पोलीसात याप्रकरणी नोंद करण्यात आली नव्हती.

हेही वाचा - लग्नाला नकार दिला म्हणून त्याने घटस्फोटीत महिलेच्या डोक्यात घातला दगड

दरम्यान, हे अर्भक स्त्री जातीचं असल्याने मुलगाच हवा, या मानसिकतेतून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे समाजातील विकृतता पुन्हा समोर आली आहे. पोटच्या बाळाला काट्यात टाकताना जन्मदात्यांचा हात थरथरला नाही का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

First published: February 24, 2020, 10:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading