• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'घरात संवाद असावा ही माझी पहिल्यापासून भूमिका', धनंजय मुंडेंनी पंकजा यांना पुन्हा घातली साद

'घरात संवाद असावा ही माझी पहिल्यापासून भूमिका', धनंजय मुंडेंनी पंकजा यांना पुन्हा घातली साद

कोरोना उपचारानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना उपचारानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला.

धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर बोलताना मुंडे कुटुंबाच्या नात्यावरही भाष्य केलं आहे.

  • Share this:
बीड, 12 डिसेंबर : 'लोकांच्या प्रश्नांसाठी लढा उभा करणं दिवंगत मुंडे साहेबांकडून शिकायला मिळालं, तर प्रश्न सोडवणं पवारसाहेबांकडून शिकलो. माझ्या सारखा नशीबवान मीच,' अशा भावना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. ते आज गोपीनाथ गडावर जयंती निमित्त दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना मुंडे कुटुंबाच्या नात्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'आज साहेबांची जयंती म्हटलं की मनाला वेदना होतात. अप्पांचा वाढदिवस मी परळीत मोठ्या थाटा माटात साजरा करायचो. अण्णांच्या जाण्यानंतर मुंडे कुटुंबात या पीढीतला मी सर्वात मोठा आहे. घर मध्ये जरी राजकीय वैर असलं तर घरात संवाद असावा ही माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे. तसं होत असेल तर आमची काहीच अडचण नाही. शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि घर घराच्या ठिकाणी असावं, अस मानणारा मी आहे.' धनंजय मुंडेंनी याआधीही दिला होता पंकजा यांना आधार काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या आजारी होत्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी भावाच्या नात्याने त्यांना सल्ला देत आधार दिला होता. 'मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे,' अशी माहिती ट्विटरवरून पंकजा मुंडे यांनी दिली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी कोरोना विषाणूच्या त्रासाबाबत माहिती देत पंकजा यांना आवाहन केलं होतं की, 'पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.'
Published by:Akshay Shitole
First published: