रागाचा एक क्षण आणि उद्धवस्त झाला संसार, पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर तरुणाने संपवलं जीवन

रागाचा एक क्षण आणि उद्धवस्त झाला संसार, पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर तरुणाने संपवलं जीवन

किशोर टेकाळे याचा आपल्या पत्नीसोबत किरकोळ वाद झाला होता

  • Share this:

बीड, 13 एप्रिल : रागाचा एक क्षण कसा संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करू शकतो, हे दाखवणारी घटना बीडमध्ये घडली आहे. गेवराई तालुक्यातील चंकलाबा याठिकाणी ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे . किशोर प्रल्हादराव टेकाळे ( वय - 26 ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

किशोर टेकाळे याचा आपल्या पत्नीसोबत किरकोळ वाद झाला होता. याचाच राग मनात धरून त्याने आत्महत्या केल्याचे समजते. काल रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान किशोरने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी चंकलाबा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चंकलाबा पोलीस करत आहेत.

हेही वाचा- लॉकडाऊनमध्ये मोठा अपघात, केमिकल कंपनीत भीषण स्फोटात दोघांचा मृत्यू

दरम्यान, एकीकडे कोरोनाचं संकट सुरू असताना राज्यातील गुन्ह्यांचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. वसईत कार पार्किंगच्या किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची घटना घडली असून वसई पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.

वसईत किरकोळ वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. चारचाकी वाहन पार्किंग वरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले तीन जणांनी मिळून महेश बडगुजर (40) यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वसई पोलिसांनी सुभाष राठोड ,अंजना राठोड , व हेमंत चव्हाण या तिघांना तात्काळ अटक केली असल्याचे वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले आहे.

First published: April 13, 2020, 3:38 PM IST

ताज्या बातम्या