मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भावकीतील पती-पत्नीने 6 वर्षीय मुलाचा केला खून, कारण समजल्यानंतर तुम्ही हादरून जाल!

भावकीतील पती-पत्नीने 6 वर्षीय मुलाचा केला खून, कारण समजल्यानंतर तुम्ही हादरून जाल!

या प्रकरणाचा अवघ्या 12 तासात बीड पोलिसांनी छडा लावत आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणाचा अवघ्या 12 तासात बीड पोलिसांनी छडा लावत आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणाचा अवघ्या 12 तासात बीड पोलिसांनी छडा लावत आरोपीला अटक केली आहे.

बीड, 4 फेब्रुवारी : बहिणीसोबत शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या 6 वर्षीय विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली होती. बीड जिल्ह्यातील रत्नागिरी गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाचा अवघ्या 12 तासात बीड पोलिसांनी छडा लावत आरोपीला अटक केली आहे.

म्हशीला करणी करून मारल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी 6 वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी भावकीतील पती-पत्नीला अटक केली असून गुन्हा कबुल केला आहे.

बीड तालुक्यातील रत्नागिरी गावच्या शाळेत आवारात 6 वर्षीय बालकाचा काल मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केला होता. नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने करीत प्रकरणाचा उलगडा केला असून करणीच्या संशयातून ' त्या ' बालकाचा खून झाला असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.

नेकनूरपासून जवळ असलेल्या रत्नागिरी येथील शुभम ( उर्फ धर्मराज ) सपकाळ या 6 वर्षीय बालकाचा मृतदेह काल जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. काल रात्री उशिरा अहवालातून त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने करत सपकाळ यांच्या भावकीतील रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा - 400 रुपयांसाठी मैत्रीनं घेतलं शत्रुत्व; उल्हासनगरमधील तरुणाला विजेच्या खांबाला डोकं आपटून आपटून मारलं

यावेळी या दोघांनीही जुन्या भांडणातून ' त्या ' बालकाचा खून केला असल्याचे सांगितले . 'आमच्या म्हशीला करणी करून तिला ठार मारण्यात आले होते आणि त्याचा बदला म्हणून आम्ही त्याला ठार मारले,' असं आरोपींनी पोलिसांना सांगितले. रोहिदास सपकाळ यांचे घर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असून बुधवारी शुभम शाळेत खेळण्यासाठी आला असता लपाछपी खेळताना त्याला उचलून रोहिदास यांनी स्वत:च्या घरामध्ये नेले आणि तिथेच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आणून टाकला असल्याची कबुली आरोपीने दिली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी दिली. याप्रकरणी आता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

First published:

Tags: Beed, Crime news