• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कडक सॅल्युट! नदीच्या पाण्यात वाहून जात होता मुलगा, तरुणींने ओढण्यांचा दोर बनवत वाचवले चिमुकल्याचे प्राण, LIVE VIDEO

कडक सॅल्युट! नदीच्या पाण्यात वाहून जात होता मुलगा, तरुणींने ओढण्यांचा दोर बनवत वाचवले चिमुकल्याचे प्राण, LIVE VIDEO

मुलींनी ओढणींचा दोर बनवत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याचे वाचवले प्राण, LIVE VIDEO

मुलींनी ओढणींचा दोर बनवत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याचे वाचवले प्राण, LIVE VIDEO

Beed Girls save life of child by making rope of scarf Watch live Video: नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या मुलाचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • Share this:
बीड, 19 सप्टेंबर : नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका लहान मुलाचे प्राण तरुणींने वाचवले आहेत. तरुणींने धाडस दाखवत आपल्याकडील ओढण्यांचा एक दोर बनवला आणि या चिमुकल्याला नदीच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले. बीडमधील (Beed) या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल (Boy saved by girls live video viral) होत असून या धाडसी मुलींचं सर्वत्र कौतुक होत आहे. आई-वडिलांसोबत आद्यकवी मुकुंदराजस्वामी मंदिर, बुट्टेनाथ डोंगर परिसरात हा मुलगा आला होता. यावेळी हा 10 वर्षीय मुलगा नदीच्या पत्रात उतरला. मात्र पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मुलगा पाण्यात अडकला. आई- वडिलांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. पण पाण्याचा प्रवाह जोरात होता तसेच खोली किती आहे याचा अंदाज नसल्याने वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित सुलभा सोळंके या युवतीने प्रसंगावधान बाळगुन स्वतः पाण्यात उतरली. सुळभा सोळंके या तरुणीने आपल्या इतर मैत्रिणींच्या ओढण्या एकत्र केल्या आणि त्यांचा एक दोर बनवला. यानंतर या दोराच्या मदतीने आणि इतरांच्या मदतीने त्या बालकाचे प्राण वाचविले. हा प्रकार आज दुपारी वाण नदीच्या पात्रात घडला. अंबाजोगाई व परिसरात मोठा पाऊस झाल्याने आद्यकवी मुकुंदराजस्वामी मंदिर,बुट्टेनाथ डोंगर परिसरात वाहत्या नद्या, धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सेल्फी काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी लहान मुलांना घेऊन नागरिक गर्दी करत असल्याने अशा अपघाताच्या घटना घडत आहेत. Pune Ganpati Visarjan: तुळशीबागच्या विसर्जन मिरवणुकीत पोलीस कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक, LIVE VIDEO बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले ओढे तसेच धबधबे ओसंडून वाहत आहेत. यातच या ठिकाणी पाहण्यासाठी हौशी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी धोकादायक ठिकाणी लावून सेल्फी काढून पाण्यात उतरून जीवावर बेतू शकतं याचं भान न ठेवता उतरत असल्यामुळे असे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने पर्यटन स्थळाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. सेल्फीच्या नादात तोल गेला अन् अजिंठा लेणीतील कुंडात पडला सेल्फी काढताना जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंडा पैकी असलेल्या एका कुंडामध्ये एक महाविद्यालयीन तरुण पडला. वेळीच ही बाब उपस्थितांच्या लक्षात आल्याने सुदैवाने त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्याला दोरीच्या साह्याने स्थानिकांनी बाहेर काढले. अजिंठा लेणीमध्ये सात कुंड आहेत, त्यातील पहिल्या कुंडात तरुण पडला होता. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी अजिंठा लेणीच्या परिसरात पर्यटनासाठी आले होते त्यावेळी ही घटना घडली. सप्त कुंडाच्या सुरुवातीला सेल्फी काढत असताना एकाचा तोल गेला आणि खोलवर असलेल्या गोलाकार कुंडामध्ये तो पडला होता.
Published by:Sunil Desale
First published: