भयंकर! रिक्षाला धडक दिल्यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने पुढे अनेकांना चिरडलं; 5 ठार, 7 जखमी

भयंकर! रिक्षाला धडक दिल्यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने पुढे अनेकांना चिरडलं; 5 ठार, 7 जखमी

Beed Accident : या भीषण अपघातात रिक्षातील पाच जण ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

बीड, 7 मार्च : भरधाव वेगातील ट्रक चालकाने बीड-परळी महामार्गावर (Beed-Parli Highway) हैदोस घातला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिल्यानंतर या ट्रक चालकाने पळून जाताना पुन्हा एका दुचाकीसह टाटा एसी गाडीला भीषण धडक दिली. या तिहेरी अपघातात (Accident) रिक्षातील पाच जण ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये 2 लहान बालकांचा व 3 महिलांचा समावेश आहे. हा अपघात बीड - परळी महामार्गावरील मोची पिंपळगाव फाटा , घोडका राजुरी फाटा या दोन ठिकाणी झाला आहे, तर पुढे गेल्यानंतर ट्रक देखील पलटी झाला आहे. सध्या अपघातातील जखमींवर बीड जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत.

अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. तसंच दुचाकीवरील दोघे देखील गंभीर जखमी आहेत. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- असं मरण कोणाच्याही वाट्याला येऊ नये! 4 वर्षाच्या चिमुकल्याने क्षणात सोडले प्राण

गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र घटनास्थळी ॲम्बुलन्स पोहोचायला देखील उशीर झाला. अपघाताची माहिती दिल्यानंतर देखील आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे ॲम्बुलन्स वेळेवर पोहोचू शकली नाही. अपघातातील मयत आणि जखमींची ओळख पटलेली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मृतांमध्ये तबसुम अबजान पठाण, तमन्ना अबजान पठाण ,शारो सत्तर पठाण ,रिहान अबजाण पठाण, अन्य एक जण तर जखमींमध्ये सिद्धर्थ शिंदे, जयाबाई कदम, मुजीब कुरेशी, अश्विनी पोकळे, गोरख खरसाडे व इतरांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या भयानक घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 7, 2021, 10:00 PM IST

ताज्या बातम्या