मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'तुझा बाप कर्जबाजारी झालाय, कर्ज फेडू शकत नाही' लेकीला शेवटचा फोन करत बीडमधील शेतकऱ्याची आत्महत्या

'तुझा बाप कर्जबाजारी झालाय, कर्ज फेडू शकत नाही' लेकीला शेवटचा फोन करत बीडमधील शेतकऱ्याची आत्महत्या

'तुझा बाप कर्जबाजारी झालाय, कर्ज फेडू शकत नाही' लेकीला शेवटचा फोन करत शेतकऱ्याची आत्महत्या

'तुझा बाप कर्जबाजारी झालाय, कर्ज फेडू शकत नाही' लेकीला शेवटचा फोन करत शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide : शेतकऱ्याने आपल्या मुलीला शेवटचा फोन करत आत्महत्या केली आहे.

बीड, 15 डिसेंबर : "गिताजंली तुझा बाप कर्जबाजारी झालाय, घेतलेले कर्जफेडू शकत नसल्याने जिवन असहाय्य झाले आहे. लवकर मातीला ये…" असं लेकीला फोनवर बोलून कर्जबाजारीपणाला कंटाळून 42 वर्षीय शेतकऱ्याने बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळासाहेब लक्ष्मण गोंडे (Balasaheb Gonde) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज पहाटे ही घटना उघडकीस आली असून या घटनेन हळहळ व्यक्त केली जात आहे. (Beed farmer called daughter and commits suicide)

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील (Vadavani Taluka Beed) चिंचोटी गावातील उडाली आहे. बालासाहेब लक्ष्मण गोंडे यांची पिंपरखेड शिवारातील पांढरी येथे अंदाजे दीड एकर शेती आहे. रात्री 9 वाजता घरातील मंडळीना शेतात चाललो आहे, गोठ्यावरच झोपणार आहे असं म्हणून शेतात गेले. आज सकाळी सहा वाजता नादलगांव येथे दिलेल्या मुलीला त्यांनी फोन केला.

वाचा : लसीकरण सुरू असतानाच डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर

मुलीला केला शेवटचा फोन

मुलीला फोन करुन म्हणाले, "गिताजंली तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे, घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, शेतातील पिक देखील यंदा आले नाही संपूर्ण पिक वाया गेले आहे. यामूळे मी खूप खचून गेलो आहे. आता तू सासर घरुन लवकर निघ... मी शेतातील झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या करत आहे" असं म्हणताच मोबाईल वरील संभाषण कट झाले.

तितक्याच गिताजंली या मुलीने चुलत भाऊ असणाऱ्या कालिदास रामकिसन गोंडे यांना फोन केला आणि वडिलांनी फोन करुन जे म्हटलं ते सांगितलं. तुम्ही लवकर शेतात जा अन्यथा अनर्थ घडू शकतो असं सांगितल्या बरोबर कालीदास गोंडे यांनी काही अंतरावर असलेला पुतण्या युवराज दिलीप गोंडे याला फोन केला. बाळासाहेब गोंडे यांच्या शेतात जा, तो आत्महत्या करत आहेत असं म्हणत मुलीला फोनवर बोलला आहे, तु लवकर जा… आणि आम्हाला फोन करुन सांगा.

वाचा : आई-बाबा शेतात राबतात पण पिकच येत नाही; शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी Suicide note

तितक्याच युवराज गोंडे यांनी शेताकडे धाव घेतली परंतु बाळासाहेब लक्ष्मणन गोंडे हे दोरीच्या सहाय्याने बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यांनंतर त्यांनी याची कुंटुबियांना माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली .या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी जावून वडवणी पोलीसांनी पंचनामा केला आहे. तर श्वविच्छेदन करण्यासाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी या ठिकाणी आणण्यात आला असून मयत शेतकरी बाळासाहेब गोंडे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, अविवाहित एक मुलगी व दोन विवाहित मुलीसह 10 वर्षांचा एकुलता एक मुलगा आहे. यामुळे गोंडे कुटुंब उघड्यावर आले आहे.

First published:

Tags: Beed, Crime, Suicide