धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची लूट, तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने मोठा संताप

धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची लूट, तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने मोठा संताप

यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात येत असल्याचा प्रकार बीड बाजार समितीमध्ये उघडकीस आला आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 6 फेब्रुवारी : एकही शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने बीड जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे. हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी केली जात असल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात येत असल्याचा प्रकार बीड बाजार समितीमध्ये उघडकीस आला आहे.

तुरीसाठी शासनाचा हमी भाव 5800 रुपये इतका आहे. तर व्यापारी बोली लावताना 4200 ते 4500 पर्यंतच लावत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना तब्बल 1200 रुपयांचा तोटा सहन करवा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. 10 फेब्रुवारी पर्यंत खरेदी केंद्र चालू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

बीड जिल्ह्यात या वर्षी समाधानकारक पासून झाल्याने तूर लागवडीचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढले. यातच तूर काढणीला वेग आला आहे. मात्र तुरीचे दर घसरल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. बीडमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने तुरीचे खरेदी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांची अडचण समजून लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरु करा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

'आपल्यातील भांडणे विसरुन कठोर निर्णय घेणे आवश्यक', अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

'एकही शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे तूर तयार करून घरात पडली आहे. मात्र, बेभाव विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. शासनाचा हमीभाव 5 हजार 800 एवढा आहे. मात्र, आम्हाला चार ते सव्वाचार हजार रुपये क्विंटल दराने आमची तूर विकावी लागत आहे, असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत सरकार लवकरात लवकर निर्णय घेणार का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, बीड जिल्ह्यात सततची दुष्काळी परिस्थिती त्यात गेल्या वर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे बळीराजा हतबल झालेला होता. या सगळ्या बिकट परिस्थितीत थोडेफार पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र, त्या पिकांना दर नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हातावर तुरी ठेवल्याचे चित्र आहे. या बाबतीत नाफेड आणि मार्केट फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.

First published: February 6, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या