शासनाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट, अधिकाऱ्यांच्या संगनमताने कापसाची कमी भावाने खरेदी

शासनाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट, अधिकाऱ्यांच्या संगनमताने कापसाची कमी भावाने खरेदी

येणाऱ्या हंगामातील मशागत आणि पेरणी कशी करावी, अशी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.

  • Share this:

बीड, 2 मे : अगोदरच लॉकडाऊन मुळे संकटात सापडलेला कापूस उत्पादक शेतकरी आता कापूस खरेदी होत नसल्याने भरडला जात आहे. सीसीआय आणि पणनच्या शासकीय कापूस खरेदी केंद्राने कमी प्रतीचा कापूस खरेदी करण्यास नकार दिला. यामुळे विक्री अभावी घरातील पांढऱ्या सोन्याची माती होते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली. यामुळे येणाऱ्या हंगामातील मशागत आणि पेरणी कशी करावी, अशी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.

धक्कादायक म्हणजे शासकीय खरेदी केंद्रवारील पणनच्या प्रतवारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे लूट होत आहे, असा आरोप आहे. तसंच ही लूट थांबवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. यात माजलगाव येथील शासनाच्या खरेदी केंद्राने नॉन 'एफएक्यू'चे कारण दाखवत नाकारलेला कापूस त्याच खरेदी केंद्रवार जिनिग मालक कमी दराने 2 हजार ते 2800 रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करत आहेत. शासनाचा हमी भाव हा 5500 आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हातावर फक्त 2 हजार ते 2800 येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर होक असल्याचं चित्र आहे.

बीड तालुक्यातील घोडका राजुरी आणि कामखेडा गावातील शेतकरयांनी 50 किलोमीटर वरील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर स्वतः वाहनाने कापूस घेऊन गेले. मात्र त्या ठिकाणच्या प्रतवारी अधिकाऱ्याने कमी प्रतीचे (फर्दड आणि कवडी चे)कारण दाखवत परत पाठवला. यामुळं वाहन खर्चाचा भुर्दंड शेतकऱ्यांना भरावा लागला, असे कल्याण घोडके आणि शेख हमीद सांगत आहेत. तसेच शासनाने हा कमी प्रतीचा कापूस खरेदी करावा अशी मागणी करत आहेत.

हेही वाचा - मुंबई-पुण्यातून गावी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा

या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सी सी आय कापूस खरेदी केंद्र वगळता सर्व खासगी जिनिग मध्ये नॉन एफ ए क्यू चा कापूस खरेदी करा आशा सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यात वेगळीच स्थिती आहे. 'प्रत्यक्ष शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शासनाने दिलेल्या नियमानुसार आम्ही कापूस खरेदी करत आहोत. एफ ए क्यू कापूस असेल तरच खरेदी केला जाईल नॉन एफ ए क्यू कापूस परत पाठवा असे शासनाचे निदेश आहेत. त्यामुळे कापूस परत पाठवतो. तो कापूस व्यपाऱ्याला विकावा, असे उत्तर प्रतवारी अधिकारी विकास नाखलेयांनी सांगितले,

नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या संकटामुळे कापसाची वाताहत सुरू आहे. यामुळे शासनाने एफ ए क्यू आणि नॉन एफ ए क्यू असा फरक न करता दोन्ही साठी भाव निश्चित करून कापूस खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. यातच काही ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही लूट सुरू आहे. यात कुंपणच शेत खात आहे अशी परिस्थिती झाली यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबवा, अशी मागणी केली जात आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 2, 2020, 4:15 PM IST

ताज्या बातम्या