Home /News /maharashtra /

कोरोनामुळे जीवनसाथी गेला, मिळालेले 54 लाख जाळायचेय का? पतीचा उदीग्न सवाल

कोरोनामुळे जीवनसाथी गेला, मिळालेले 54 लाख जाळायचेय का? पतीचा उदीग्न सवाल

शेकडो कोरोनाबाधित रुग्णांना बरं करणाऱ्या बीड जिल्हा रुग्णालयातील परिचारिका अर्थात कोविड योद्धा छाया ससाणे यांचा कोरोनानं मृत्यू झाला.

बीड, 8 नोव्हेंबर: शेकडो कोरोनाबाधित रुग्णांना बरं करणाऱ्या बीड जिल्हा रुग्णालयातील परिचारिका अर्थात कोविड योद्धा छाया ससाणे यांचा कोरोनानं मृत्यू झाला. छाया ससाणे यांच्या कुटुंबाला राज्य सरकारनं 50 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. मात्र ससाणे कुटुंबाला आर्थिक मदत मिळाल्यानंतर त्या कुटुंबानं व्यक्त केलेल्या भावना अत्यंत बोलक्या आहे. माझ्या पत्नीनं शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा केली. आता सरकारनं वेगवेगळ्या माध्यमांतून 54 लाखांचा विमा दिला. 'पैसे भरपूर मिळाले हो, पण साथीदारच गेला. आता या पैशाला काय जाळायचाय का? असा उदीग्न सवाल छाया ससाणे यांचे पती प्रकाश ससाणे यांनी सरकारला केला आहे. हेही वाचा..गौरी गडाख यांच्या मृत्यूबाबत झाला मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर बीड शहरातील ससाणे कुटुंबातील छाया प्रकाश ससाणे या जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिका म्हणून गेल्या 15 वर्षांपासून रुग्णसेवा करत होत्या. पती प्रकाश हे ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाला आर्थिक गाडा चालवत होते. सुखाने संसार सुरू होता. खुशी व श्रेया, अशा दोन मुली असलेल्या छाया शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची सेवा देत होत्या. सुरक्षेची सगळी खबरदारी घेऊन देखील छाया यांना कोरोनानं घेरलं. त्यांच्यावर आठ दिवस उपचार सुरु होते. जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व मित्रमंडळी त्यांच्या बरं होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. मात्र, छायाताईंवर कोरोनानं मात केली. त्यांच्या दुर्दैवी निधनानं संपूर्ण वैद्यकीय मित्रमंडळी शोककळा पसरली. पत्नीच्या निधनानं पती प्रकाश ससाणे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी प्रकाश यांच्यावर आहे. सरकारने 50 लाखांची आर्थिक मदत केली. आर्थिक मदत मिळाल्यानंतर प्रकाश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पैसे मिळाले मात्र माझा साथीदार गेला. शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचा आमचे स्वप्न अधुरं राहिलं. आता फक्त या दोन मुलींना शिकून मोठं करायचं माझे स्वप्न आहे. साथीदार गेला आता पैशाचं काय? अशा भावना प्रकाश ससाणे व्यक्त करत असताना डोळ्यात पाणी आलं होतं. आईचं स्वप्न पूर्ण करणार... कोरोनाशी लढा देताना माझी आई शाहीद झाली. तिचा मला सार्थ अभिमान आहे. सुरक्षेचे सगळे खबरदारी ते घेत होती. घरी आल्यानंतर आम्हाला जवळ येऊ देत नव्हती माझ्यापासून कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे, असं वारंवार म्हणायची त्याचबरोबर तिच्या मैत्रिणींना धीर द्यायची. कोरोना वार्डात काम केले काही होत नाही, स्वतः ची खबरदारी घेऊन सेवा द्या, असे ती सांगायची. मात्र, तिलाच कोरोना झाल्यानंतर आम्ही सगळे घाबरलो. सगळे प्रयत्न केले, मात्र कोरोना जिंकला. तिचं स्वप्न मला पूर्ण करायचे रुग्णांची सेवा करायची तशीच सेवा मी देखील स्टाफ नर्स होऊन करणार आहे. तिचं रुग्णसेवेचा अधुरे राहिलेले स्वप्न मी पूर्ण करणार,अशी भावना छाया बाहेर यांची मोठी मुलगी खुशी ससाणे हिने व्यक्त केली. छाया ही माझी जवळची मैत्रीण होती आम्ही दोघे सोबत हॉस्पिटल ला जायचो सुरुवातीला मला काम करत असताना भीती वाटायची. मात्र त्यावेळी माझी समजूत काढली होती मला धीर दिला होता. सुरक्षेची खबरदारी घेऊन कोरोना रुग्णांची सेवा चांगल्या पद्धतीने करू शकतो, असे सांगायची मात्र कोणाच्या संकटात मृत्यू झाल्याने माझी जवळची मैत्रीण केली, अशी भावना त्याची मैत्रीण अनिता कांबळे यांनी व्यक्त केली. हेही वाचा..मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला! नरेंद्र पाटलांची सरकारवर अत्यंत खालच्या भाषेत टीका 21 जुलै 2020 रोजी छाया बहिरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांनी कोरोना वार्डात कर्तव्य बजावले होते. याचदरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. ज्यांचा कोरोनाशी लढा देताना बळी गेला, अशांना शासनाने 50 लाख रुपयांचे विमा कवच जाहीर केले होते. शुक्रवारी छाया यांचे पती प्रकाश ससाणे यांच्या बँक खात्यावर 50 लाख रुपयांचा विमा आणि 3 लाख 96 हजार रुपयांचा राज्य शासकीय विमा निधी देण्यात आला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून छाया यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली आहे. योद्धा परिचारिकेच्या कुटुंबियांना विमा मिळाला आहे. पैशात हे दु:ख भरून येणार नाही. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या कायम सोबत असू, असं जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितले
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Beed, Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus, World After Corona

पुढील बातम्या