परळी, 12 फेब्रुवारी: सुट्टीसंपवून पुन्हा ड्युटीवर रुजू होण्यासाठी निघालेल्या जवानाचं विमान थोडक्यात चुकल्यानं त्याच्यासमोर समस्या निर्माण झाली होती. देशासह नागरिकांचं संरक्षण करणाऱ्या या जवानासमोर आज संकट उभं राहिलं होतं. उशीर झाल्यानंतर आपल्याला कारवाईचा सामना करावा लागणार याची हूरहूर मनात असतानाच त्याच्या मदतील राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे धावून गेले. त्यांनी जवानाची मदत केली आणि जवानाला दिल्लीसाठी विमानाचं तिकीट स्वत: काढून दिलं.
सुट्टी संपवून पुन्हा ड्युटीवर रुजू होण्यासाठी निघालेला परळी इथला बीएसएफचा जवान वैभव मुंडे यांचं श्रीनगरला जाणारं विमान चुकलं. त्याचं कारण होतं औरंगाबादहून येणारी ट्रेन उशिरा आल्यानं हे विमान चुकलं. त्यावेळी जवानासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. त्याचवेळी योगायोगानं धनंजय मुंडे विमानतळावर त्या जवान भेटले आणि विचारपूस करत असताना हा संपूर्ण प्रकार त्यांना समजला.
सुट्टी संपवून देशसेवेसाठी निघालेल्या परळीतील पांगरी येथील बीएसएफ जवान वैभव मुंडे यांची औरंगाबादला येणारी रेल्वे लेट झाल्याने श्रीनगरला जाणारे विमान हुकले. कारवाईच्या भीतीने चिंताग्रस्त वैभव यांचे विमान तिकीट काढून दिले. देशरक्षणास तत्पर सैनिकाला मदत करणे हे माझे परम कर्तव्य आहे. pic.twitter.com/mBDdFAgQun
बीड जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा आटोपून औरंगाबाद येथून मुंबईकडे निघालेल्या धनंजय मुंडे यांनी विमानतळावर अचानक भेटलेल्या या जवानाची चौकशी केली. त्यावेळी त्यांना ही समस्या तरुणानं सांगितली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वेळ न दवडता तातडीनं तरुणाला तिकीट काढून दिलं. जवानासमोर उभी असलेलं संकट टळल्यानं त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि धनंजय मुंडे यांचे आभार मानले.