मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बाळंतीन 5 दिवसांच्या बाळासह पुरात अडकली; वाचवण्यासाठी देवमाणूस आला धावून, पाहा LIVE VIDEO

बाळंतीन 5 दिवसांच्या बाळासह पुरात अडकली; वाचवण्यासाठी देवमाणूस आला धावून, पाहा LIVE VIDEO

माऊली गडदे यांनी पाऊस चालू असताना वतच्या कार मध्ये जीवाची परवा न करता मदतीला धावून गेले.

माऊली गडदे यांनी पाऊस चालू असताना वतच्या कार मध्ये जीवाची परवा न करता मदतीला धावून गेले.

माऊली गडदे यांनी पाऊस चालू असताना वतच्या कार मध्ये जीवाची परवा न करता मदतीला धावून गेले.

  बीड, 4 जून: परळी तालुक्यातील बोधेगाव (Bodhegaon, Parali) रात्री दहाच्या सुमारास मुसळधार पाऊस (Heavy rainfall) झाला. या पावसामुळे ओढ्यास पाणी आले पाण्याचा अंदाज न आल्याने जीप चालकाने पाण्यात जीप घातली. पण पाणी जास्त असल्याने गाडी वाहून जावू लागली (Jeep floaded in river). गाडीत पाच दिवसांची ओली बाळंतीन, पाच दिवसाचे बाळ (Mother with 5 days baby), ड्रायव्हर आणि सहकारी महिला अडकून पडले होते. यात स्टेअरिंगपर्यंत पाणी आलं. दरवाजा उघडने मुश्किल झालं स्वतःच जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर गाडीच्या टपावर चढला आरडा ओरडा केला. याच दरम्यान मदतीला धावून आला देवमाणूस. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे.

  त्यावेळी पडत्या पावसात ओढ्याच्या पाण्यात अडकलेल्या चौघांना स्वतःचा जीव धोक्यात घालून माऊली गडदे या जिगरबाज देवदूताने गावकऱ्यांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी बाळासह सुखरूप बाहेर निघालेल्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले आणि माऊली चे पाय धरले. सर्व स्तरातून जीवनदान देणाऱ्या माऊलीचे कौतुक होत आहे.

  अंबाजोगाईच्या रुग्णालयातून बाळंतीन माता आणि पाच दिवसाच्या बाळाला घेऊन बोधेगाव मार्गे बोलेरो गाडीने आपल्या कासारी बोडका या गावी जात असताना त्यांना पावसाने बोधेगाव जवळ झोडपले. पाण्याचा अंदाज न आल्याने ड्राव्हर ने गाडी ओढ्यात घातली गाडीत स्टेअरिंगपर्यंत पाणी आले. लहान बाळाला पोटाशी धरून ओली बाळंतीन गाडीत होती. रात्री कोणीही मदत करायला यायला तयार नव्हते. ड्रायव्हरने सिरसाळा पोलीस बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली गडदे यांना फोन करून त्या कुटुंबांना वाचविण्याचे आवाहन केले. माऊली गडदे यांनी स्वतः पहिल्यांदा जाऊन घटनास्थळी आरडाओरडा करुन गावकऱ्यांना बोलून घेतले आणि गावकऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.

  राज्यात मान्सूनपूर्व बरसण्यास सुरुवात, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, पुढचे दोन दिवस इशारा

  मी अगोदर सुरुवातीला सोल घेऊन पाण्यात उडी मारली सुरवातीला गाडीला बांधून झाडाला बांधले, नंतर माणसं वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. सुरुवातीला पाच दिवसाच्या लहान मुलाला बाहेर काढले पुन्हा हळूहळू सर्वांना सुखरूप बाहेर काढले. कासारी बोडखा येथील बडे कुटुंबातील ही माणसं होती. त्यांना पहाटे दोन वाजता पाणी कमी झाल्यानंतर गाडी काढून देऊन सुखरूप घरी पाठवले असे माऊली गडदे यांनी सांगितलं.

  माऊली गडदे यांनी पाऊस चालू असताना वतच्या कार मध्ये जीवाची परवा न करता मदतीला धावून गेले. बोधेगावच्या ग्रामस्थांना बोलविले ट्रॅक्टर घेवून लोक मदतीला धावले. ओढ्याच्या पाण्यात येवून त्या तिघाना सुखरूप बाहेर काढले कार रात्री झाडाला बांधून ठेवली. पहाटे ओढ्याचे पाणी ओसरले ल्या नंतर गाडी बाहेर काढली. पाच दिवसाच्या बाळंतीनसह मुलाला व इतर दोघांनाही सुरक्षित घरी घेऊन दुसऱ्या गाडीने त्यांच्या घरापर्यंत पोहोचत केले, यामुळे माऊली गडदे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Beed, Rain