घरमालकावर कत्तीने प्राणघातक हल्ला करून चोरी, बीडमध्ये खळबळ

घरमालकावर कत्तीने प्राणघातक हल्ला करून चोरी, बीडमध्ये खळबळ

घरमालकावर कत्तीच्या साह्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई इथं घडला आहे.

  • Share this:

बीड, 3 मार्च : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या सहा जणांना घरमालकाने हटकले. त्यामुळे चिडून त्यांनी घरमालकावर कत्तीच्या साह्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई इथं घडला आहे. अनंत लालासाहेब लोमटे (वय 39)असे त्या जखमी घरमालकाचे नाव आहे.

घरात घुसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी आधी घरमालकाला गंभीर जखमी केलं आणि त्यानंतर त्यांचे लॉकेट घेऊन पोबारा केला. सध्या जखमी अनंत लालासाहेब लोमटे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या प्रकरणात चार जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्राणघातक हल्ल्यामुळे आंबेजोगाई परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे बीडमध्ये घरमालकावर हल्ला करून चोरी करण्यात आल्याची घटना घडली असताना दुसरीकडे पिंपरी- चिंचवड परिसरात घरफोडयांनी 7 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी आता समोर येत आहे.

हेही वाचा- लग्नात डान्स करत होती 13 वर्षांची मुलगी, चॉकलेटचं आमिष दाखवत नराधमाने केला बलात्कार

खून, बलात्कार, दरोडीखोरी यांसारख्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत आहे. त्यामुळे गृहमंत्रालय आणि पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांवर अंकूश ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, म्हणजे असे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा नागरिक आता व्यक्त करत आहेत.

First published: March 4, 2020, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading