बीडमध्ये पुन्हा राडा, हाणामारीत 4 जण गंभीर जखमी

बीडमध्ये पुन्हा राडा, हाणामारीत 4 जण गंभीर जखमी

या फ्री स्टाईल हाणामारीमध्ये महिला आणि पुरुषांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

बीड, 31 मे : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील नंदपुर कांबी येथे जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हानामारी झाली. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हाणामारीत जखमी झालेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जमिनीच्या वादातून दोन गट भिडल्यानंतर शेख हुसेन, शेख चांद हे गंभीररित्या जखमी झाले. तसंच इतर दोन जणांनाही गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या फ्री स्टाईल हाणामारीमध्ये महिला आणि पुरुषांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळालं. शेतातील झाड तोडणायावरून हे भांडण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, बीडमधील जमिनीच्या वादावरून तिहेरी हत्याकांड प्रकरण ताजे असताना हा प्रकार गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात शेतजमिनीचे क्षुल्लक वाद जीवघेणे ठरत असल्याचं चित्र आहे.

यापूर्वी काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. वादातून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मांगवडगाव इथे घडली असून तिहेरी हत्येनं बीड हादरलं होतं. मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं होतं.

First published: May 31, 2020, 11:37 PM IST
Tags: beed crime

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading