Home /News /maharashtra /

मोकाट गायींनी महिलांना तुडवलं, अंगावर काटा आणणारा थरारक CCTV VIDEO

मोकाट गायींनी महिलांना तुडवलं, अंगावर काटा आणणारा थरारक CCTV VIDEO

माजलगाव शहरात मोकाट जनावरांची दहशत निर्माण झाली आहे

बीड, 01 मार्च : रस्त्यावर मोकाट सुटलेल्या जनावरांनी गावात हैदोस घातला आहे. माजलगावमध्ये मोकाट जनावरांनी रस्त्याने चालणाऱ्या महिलांवर जोरदार हल्ला केला. महिलेला या जनावरानं शिंगांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात एका महिला चांगलीच दुखापत झाली आहे. तर डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी महिलांवर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. या घटनांमुळे माजलगाव शहरात मोकाट जनावरांची दहशत निर्माण झाल्यानं भीतीचं वातावरण आहे. दिवसेंदिवस मोकाट जनावरांकडून नागरिकावर होत असलेल्या हल्ल्याचं प्रमाणही वाढलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा आहे. हे वाचा-सोनूचे स्टार चमकले, एका स्माईलने लेझच्या पाकिटावरही झळकला शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन महिला रस्त्याने चालत असताना अचानक दोन गायींनी हल्ला चढवला. शहरात मोकाट गायींनी उच्छाद घातला आहे . हल्ला करणाऱ्या गायीला पकडण्याचा आठ दहा तरुणांनी प्रयत्न केला . परंतु गायीनं महिलेला शिंगावर घेऊन आपटलं. दुसऱ्या एका ठिकाणीही दोन महिला आणि एका मुलीला गायीने मारल्याची घटना घडली आहे .मोकाट गायींच्या अशा हल्ल्यांमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे . हे वाचा-VIDEO : लय भारी! या तरुणाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हीही व्हाल थक्क

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Kranti Kanetkar
First published:

Tags: Beed, Beed news

पुढील बातम्या