Home /News /maharashtra /

पठ्ठ्याने थेट पुराच्या पाण्यातून घातली गाडी, नागरिकांमुळे वाचला जीव; VIDEO VIRAL

पठ्ठ्याने थेट पुराच्या पाण्यातून घातली गाडी, नागरिकांमुळे वाचला जीव; VIDEO VIRAL

अचानक पाणी वाढल्याने सदर तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला.

    बीड, 23 जुलै : बीड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने गेवराई तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला. या पुराच्या पाण्यातून गाडी चालवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी ह वाहून जाणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवल्याने मोठा अनर्थ टळला. गेवराई तालुक्यातील रोहीतळ येथील लेंडी नदीला पूर आला होता. पुलावरून पाणी वाहत असताना एका तरुणाने मोटारसायकल पाण्यात घातली. अचानक पाणी वाढल्याने सदर तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला. मात्र त्याचवेळी नदीच्या काठावर उभ्या असलेल्या नागरिकांनी त्या तरुणाला मोठ्या मेहनतीने बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. त्यानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गेवराई तालुक्यात दोन दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यातच काल झालेल्या पावसाने पिकांचं नुकसान मोठया प्रमाणत झालं आहे. तर गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील 20 गावं जोडणाऱ्या पुलाची उंची कमी असल्याने पुलावरुन पाणी वाहू लागल्यामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. गेवराई - जातेगाव रस्त्यावरील वाहतूक तब्बल 3 तास ठप्प होती. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना व परिसरातील नागरिकांना अनेक वेळ ताटकळत बसावे लागले होते.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Beed

    पुढील बातम्या