Home /News /maharashtra /

Beed: मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

Beed: मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

Suicide news: मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी घरातून निघालेल्या दोन बहिणींचा विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात आहे की घातपात याबाबत बोलीस तपास करत आहेत.

बीड, 5 फेब्रुवारी: बीड जिल्ह्यातील (beed district) अंबाजोगाई शहरातील (Ambajogai city) विहिरीत दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह (2 sisters found dead) आढळून आला आहे. विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळीच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख (वय 16) आणि सानिया अल्ताफ शेख (वय 18) अशी त्या बहिणींची नावे आहेत. या संदर्भात नेमकी हत्या की आत्महत्या या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. या घडल्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Two sisters found dead in Beed) अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडलगत कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिशय गरीब कुटुंबातील निदा आणि सानिया या दोघी आई-वडिलांसोबत अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहतात. अल्ताफ हे फिरून भांडेविक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांची पत्नी धुणीभांडी करते. वाचा : नाशिकमध्ये भीषण अपघात, भरधाव कार थेट दुकानात शिरली, अपघाताचा Shocking VIDEO मैत्रिणीच्या वाढदिवसाला घरातून बाहेर पडल्या आणि... काल दुपारी अल्ताफ यांनी निदा आणि सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडी येथे सोडले होते. स्वाराती रुग्णालयाला जाणाऱ्या रोडलगत कंपनी बागेच्या विहिरीबाहेर शेळ्या चारत असलेल्या एका व्यक्तीला दोन मुलीचे मृतदेह दिसल्याने ही घटना उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवले. ही घटना आत्महत्या, घातपात आहे की अपघाती मृत्यू याचा देखील आता तपास करावा लागणार आहे. मात्र, एकाच वेळी आपल्या दोन्ही मुली गमवाव्या लागल्याने शेख कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. लग्न ठरलं मृत्यूचं कारण; कोल्हापुरात तरुणानं केला भयावह शेवट कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी याठिकाणी एका 30 वर्षीय तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्न जुळत नसल्याने नैराश्य आल्याच्या कारणातून त्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही काळापासून अनुप याचं लग्न जुळत नव्हतं. वयाची 30 वर्षे झाली असताना देखील आपलं लग्न जुळत नाही, म्हणून अनुपला नैराश्य आलं होतं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, Beed news, Crime, Death, Maharashtra, Mumbai, Shocking news, Suicide, Suicide news

पुढील बातम्या