...सोबत राहून विश्वासघात करू नका, धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना भरला दम

'ज्यांना विरोधात काम करायचे आहे त्यांनी सांगून बाहेर पडा, सोबत राहून विश्वासघात करू नका', अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दम भरला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 09:54 PM IST

...सोबत राहून विश्वासघात करू नका, धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना भरला दम

बीड, 24 सप्टेंबर : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. 'सरकारच्या कारभारात टाचणी पडल्याच्या घटनेचीही मला माहिती मिळते. त्यामुळे कोणता कार्यकर्ता विरोधात काम करत आहे, हे समजत नाही, असे समजू नका. ज्यांना विरोधात काम करायचे आहे त्यांनी सांगून बाहेर पडा, सोबत राहून विश्वासघात करू नका', अशा शब्दांत मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दम भरला आहे.

(वाचा :निवडणुकीच्या आधी EDचा दणका, शरद पवार आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल!)

परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. पुढे ते असंही म्हणाले की, 'जय-पराजय काहीही होईल हृदयात राहा, डोक्यात राहू नका. यावेळी चूकीला माफी नाही', असं म्हणत धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

(वाचा :शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले...)

'विधानसभेची निवडणूक ही भाजपाच्या सत्ता, पैसा आणि भावनिकता विरूद्धची माझी सामान्य माणसाच्या विकासाची लढाई आहे. मतदार संघातील प्रत्येक माणसाचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. 22 वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली त्यात कधी कमी पडलो नाही, या सेवेची मताच्या आशीर्वादाच्या रूपाने परतफेड करा',असे आवाहनही मुंडे यांनी यावेळेस केले.

Loading...

(वाचा :राज्य शिखर बँकप्रकरणी गुन्हा दाखल : शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया)

VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली 'ही' घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...