बीड : राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंच्या पत्नीच्या सभेजवळ हल्ला, एक जण जखमी

बीड : राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंच्या पत्नीच्या सभेजवळ हल्ला, एक जण जखमी

सारिका सोनवणे यांच्यावर हल्ला होताना वार अडवण्याचा प्रयत्न करणारा सरपंच जखमी झाल्याची माहिती आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 29 मार्च : मद्यधुंद तरुणाने हातात कोयता घेऊन शुक्रवारी संध्याकाळी धारूर तालुक्यातील धर्माळा गावात धुडगूस घातला. तसंच यावेळी दोन दुचाकीदेखील फोडल्या. यावेळी त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी सरपंचांच्या बोटाला किरकोळ मार लागला. मद्यपीचा गोंधळ सुरु असताना तिथून 250 मीटर अंतरावर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका यांची कॉर्नर बैठक सुरु होती. मद्यपीचा जोरजोरात आरडाओरडा सुरु असल्यामुळे इकडे सोनवणे यांच्या सभेत काहीकाळ व्यत्यय आला.

या गोंधळाप्रकरणी वैजनाथ सोळंके (रा. धर्माळा, ता. धारूर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ते घरासमोर थांबले असताना गणेश विठू कदम हा मद्यधुंद अवस्थेत कोयता घेऊन त्यांच्या घरासमोर आला आणि गोंधळ घालू लागला. वैजनाथ यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता गणेशने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वैजनाथ यांच्या बोटाला किरकोळ जखम झाली असून दोन टाके पडले आहेत. त्यांनतर गणेशने दोन दुचाकीही फोडल्या. यावेळी वैजनाथ यांचे वडील आणि शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले.

याप्रकरणी वैजनाथ सोळंके यांच्या फिर्यादीवरून गणेश कदम याच्यावर धारूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वैजनाथ सोळंके आणि गणेश कदम हे एकमेकांचे अतिशय जवळचे नातेवाईक असल्याचे समजते.

सारिका सोनवणे यांच्या सभेत व्यत्यय, मात्र हल्ला नाही

हा सगळा प्रकार सुरू असताना 250 मीटर अंतरावर राष्ट्रवादीचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका यांची कॉर्नर सभा सुरू होती. मद्यपीचा आरडाओरडा सुरू असल्याने त्यांच्या सभेत व्यत्यय आला. तेवढ्यात सारिका सोनवणे यांच्यावरच हल्ला झाला अशी अफवा कोणीतरी पसरवली.

निवडणुकांमुळे बीड जिल्ह्यात सध्या आतिशय संवेदनशील वातावरणा असल्याने ही अफवा सोशल मीडियावरून लगोलग व्हायरल झाली. परंतु, घटनेची सखोल माहिती घेतली असता त्यात कसलेच तथ्य आढळून आले नाही. सोनवणे यांची सभा आणि मद्यपीचा गोंधळ यांच्यात कसलाही संबंध नसल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.

VIDEO : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून बेदम मारहाण

First published: March 29, 2019, 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading