विद्यार्थीप्रिय शिक्षकाने क्षणात संपवलं जीवन, अख्खं गाव हळहळलं!

विद्यार्थीप्रिय शिक्षकाने क्षणात संपवलं जीवन, अख्खं गाव हळहळलं!

मनोजकुमार पोटभरे हे अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. इंग्रजी विषयामध्ये त्यांचे प्रभुत्व होते.

  • Share this:

बीड, 21 फेब्रुवारी : बीडच्या अंबाजोगाईमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोजकुमार प्रभाकर पोटभरे (वय 35) असं मृत शिक्षकाचे नाव आहे.

मनोजकुमार पोटभरे हे धारूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर कर्तव्य बजावत होते. दरम्यान त्यांनी एक सुसाईड नोट लिहून घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मित नोंद झाली आहे.

या शिक्षकाने आंबेजोगाई येथे राहत्या घरी कौटुंबिक कलहातून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - हृदय पिळवटून टाकणारी घटना! 5 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करुन बलात्कार; हत्येचाही केला प्रयत्न

धारुर तालुक्यातील पिंपळवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले मनोजकुमार पोटभरे हे अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. इंग्रजी विषयांमध्ये त्यांचे प्रभुत्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात रस निर्माण करण्यात त्यांचा हातखंडा होता.

अतिशय शांत, संयमी आणि एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची धारुर तालुक्यात ओळख होती. परंतु त्यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 21, 2021, 11:15 PM IST

ताज्या बातम्या