बीडमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकनं बळीराजासह 2 म्हशींना चिरडलं

सोलापूर-धुळे महामार्गावर मांजरसुंब्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

सोलापूर-धुळे महामार्गावर मांजरसुंब्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:
बीड, 22 नोव्हेंबर : कोरोना आणि ऐन सणासुदीनंतरही भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं बळीराजा हताश झाला आहे. अशा परिस्थितीत काळानं घाला घातला आणि शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरी जात असताना एका भरधाव ट्रकनं शेतकऱ्यासह दोन म्हशींना जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात शेतकरी आणि दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे. सोलापूर-धुळे महामार्गावर मांजरसुंब्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ट्रकने शेतकऱ्यांसह दोन म्हशींना जोराची धकड दिली. या अपघातात शेतकऱ्यासह 2 म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्राफिक पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अपघातानंतर ग्रामस्थ रस्त्यावरती उतरले होते. भानुदास वाघिरे अस अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हे वाचा-दया तोड दो ये दरवाजा - दार उघड बयेचं भन्नाट कॉम्बिनेशन; मीमवर अतरंगी कॉमेंट्स शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांसमोरचं संकट काही कमी होत नाही. एकीकडे भाजीपाल्याचे दर निम्म्यावर आल्यानं कवडीमोल दर मिळत असल्यानं सर्व भाजीपाल फेकून देण्याची किंवा गुरांना खायला देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याच दरम्यान असा अपघात झाल्यानं वाघिरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published: