भयंकर! भरधाव ट्रकने महिलेला चिरडलं, चाक अंगावरुन गेल्याने अक्षरश: झाला चेंदामेंदा

भयंकर! भरधाव ट्रकने महिलेला चिरडलं, चाक अंगावरुन गेल्याने अक्षरश: झाला चेंदामेंदा

Beed Accident: भरधाव ट्रकने दुचाकीला मागून (Truck Accident)धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 35 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

बीड, 12 मार्च: भरधाव ट्रकने दुचाकीला मागून (Truck Accident)धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 35 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील (Accident in Beed) धारूर तालुक्यामध्ये तेलगाव याठिकाणी घडली. रत्नमाला तिडके असं या मृत महिलेचं (Woman Killed in Road Accident) नाव आहे. हा अपघात एवढा भयानक होता की अपघातात महिलेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तेलगाव हे धारूर परळी बीड माजलगाव या शहरांना जोडणारा चौक असल्यामुळे याठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. याठिकाणी बाजारपेठ देखील आहे.

काल दुपारी कासारी बोडखा येथील लक्ष्मण तिडके हे आपल्या पत्नी रत्नमाला तिडके यांच्याबरोबर बीडला कामानिमित्त आले होते. काम आटोपून गावाकडे जाताना परळी बीड रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालया समोरून हे पती-पत्नी दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी  भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांना मागून धडक दिली. या ट्रकचा क्रमांक एम एच 40 एक के 1191 आहे. यामध्ये रत्नमाला तिडके या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या. ट्रकचे चाक अंगावरून गेल्यामुळे त्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यामुळे अपघातस्थळी रक्त मांसाचा सडा पडला होता. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता.

(हे वाचा-कोरोनामुळे अकोल्यात पुन्हा निर्बंध, आज रात्रीपासून संपूर्ण लॉकडाऊन)

या अपघातात जखमी लक्ष्मण तिडके हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू झाल्याने ते या धक्क्यातून सावरले नाही आहेत. तेलगाव चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते, यातच जवळ असलेल्या स्व. सुंदरराव  सोळंके सहकारी साखर कारखान्यामुळे मोठ्या वाहनांची देखील गर्दी असते. याठिकाणी ट्रक चालक देखील अतिवेगात वाहन चालवत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहेत. या अपघातादरम्यानही गाडी कंट्रोल न झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघाताच्या घटना वाढत असल्याने वाहतुकीचे नियम कठोर करणे गरजेचे आहे. शिवाय अशा वाहनचालकांवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 12, 2021, 2:56 PM IST

ताज्या बातम्या