मुलाला बुडताना पाहून आई आणि बहिणीने पाण्यात घेतली उडी, तिघांचाही मृत्यू

मुलाला बुडताना पाहून आई आणि बहिणीने पाण्यात घेतली उडी, तिघांचाही मृत्यू

माजलगा धरणालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी काही बायका गेल्या होत्या.

  • Share this:

माजलगाव, 19 मार्च : बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आई, मुलगा आणि भाची हे तिघेही धरणात कपडे धुण्यासाठी गेले होते. पण या तिघांचाही धरणात बुडून मृत्यू झाला आहे. त्यांच्या या जाण्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी दुपारी अकराच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. माजलगा धरणालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी काही बायका गेल्या होत्या. त्यांच्यासोबत गेलेला शेख सोहेल शेख नजीम (वय 11) ला वाचवण्यासाठी गेलेल्या आई आणि भाचीचा मृत्यू झाला आहे.

आई धरणात कपडे धुवत होती. त्यावेळी मुलगा खेळता खेळता धरणात गेला. धरणाला खूप पाणी असल्याने त्याला अंदाज आला नाही आणि तो बुडाला. मुलाला बुडताना पाहिल्यानंतर आईने आणि भाचीने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण त्यांनाहो पोहता येत नव्हतं. त्यात पाण्याची पातळी खूप होती आणि धरण खोल होतं. त्यामुळे त्या दोघेही बुडाल्या.

दरम्यान, आजूबाजूला असलेल्या काही मंडळींनी आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी अनेक जण जमले आणि तिघांना बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

तर माजलगाव पोलिसांनी या तिघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर या तिघांच्या अशा जाण्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

CCTV VIDEO: भर दिवसा तरुणीला रॉकेल ओतून पेटवलं, त्याआधी चाकून केले वार

First published: March 19, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading