Home /News /maharashtra /

आठ दिवसांपासून गावात वीज नाही, शेती करायची कशी? हळहळणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा गळफास

आठ दिवसांपासून गावात वीज नाही, शेती करायची कशी? हळहळणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा गळफास

कृष्णाच्या गावाचा वीज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे शेती (Farming) कशी करावी या विवंचनेतून त्याने टोकाचा निर्णय घेतला.

बीड, 28 नोव्हेंबर : बीड (Beed) जिल्ह्यातून एक दुखद बातमी समोर आली आहे. एका 23 वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या तरुण शेतकऱ्याचं नाव कृष्णा राजाभाऊ गायके (Krushna Gayke) असं आहे. कृष्णाच्या गावाचा वीज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे शेती (Farming) कशी करावी या विवंचनेतून त्याने टोकाचा निर्णय घेतला. त्याने स्वत:च्या आयु्ष्याला संपवून घराच्या जबाबदारीतून मोकळा होण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पण त्याच्या या निर्णयाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कृष्णाच्या नातेवाईकांचे महावितरणावर गंभीर आरोप

दुसरीकडे कृष्णाच्या कुटुंबियांनी महावितरणावर गंभीर आरोप केले आहेत. अगोदरच अतिवृष्टीने कंबर मोडलेला शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी महाविवितरणकडून सक्तीची वीजबिल वसुली सुरु आहे. महावितरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. कृष्णा गायके याने आत्महत्या केली नसून महावितरणने केलेला खून आहे, असा आरोप कृष्णाच्या नातेवाईकांना महावितरणावर केला आहे. हेही वाचा : 'उद्धव ठाकरे अपघाती मुख्यमंत्री, हे विश्वासघातकी आघाडी सरकार', प्रकाश जावडेकरांच्या चौफेर टीका गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील कृष्णा गायके याने शेतात कांद्याचे बी लागवडीसाठी आणले होते. आठ दिवसांपासून शेतातील विहिरीत पाणी असताना देखील पिकाला पाणीही देता येत नाही आणि कांदाही लागवड करता येत नाही, या समस्येने तो चिंतेत होता. याशिवाय अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे अनुदान 3 आणि 2 हजार रुपये खात्यावरजमा झाले. मात्र सात आणि आठ हजार रुपये वीजबिल आणायचं कोठून? आठ दिवसात कांदा लागवड नाही केली तर उत्पन्न हातात येणार नाही. बियाण्यांसाठी गुंतवलेले पैसे देखील मिळणार नाहीत. या विवंचनेतून कृष्णाने टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ही आत्महत्या नसून कृष्णा गायकेचा महावितरणने केलेला खून आहे. अशा घटना थांबवायचे असतील तर शेतकऱ्यांची कट केलेले वीज तात्काळ जोडा. अन्यथा गावातील शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असं कृष्णाचे नातेवाईक बंडू गायके यांनी सांगितले.

'शेतकरी पायातले पायतान काढून अधिकाऱ्याला झोडपून काढतील', राजू शेट्टी आक्रमक

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महावितरणाकडून सुरु असलेल्या वीज पुरवठा खंडीत करण्याच्या आणि सक्तीवसुलीच्या कारवाईला विरोध केला आहे. "रब्बी हंगामात कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन कपात करून सक्तीची वीज बिल वसुली करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का?", असा रोखठोक सवाल राजू शेट्टी यांनी केला. जिल्ह्यातील नाव्होली येथील शेतकऱ्यांच्या संताप मेळाव्यात ते बोलत होते. हेही वाचा : 'तुम्ही आमची भावकी निवडून दिलीय, निधीत कमी पडू देणार नाही', अजित पवारांचं आश्वासन "महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली चालू केल्यामुळे शेतकऱ्यांवर रब्बी हंगामात संकट आले आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांवरील हा अन्याय तात्काळ थांबवावून त्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत जोडून द्यावेत. अन्यथा शेतकरी पायतान घेऊन अधिकाऱ्यांना झोडपून काढतील", असा आक्रमक इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या