बीड, 8 ऑगस्ट : अभ्यासाच्या तणावाला कंटाळून एका 18 वर्षांच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईतील ही घटना आहे. गुरुप्रसादचे वडील अंबाजोगाईतीलच एका शाळेत शिक्षक आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुप्रसादनं भिंतीवर आईवडिलांसाठी संदेश लिहून आपलं आयुष्य संपवलं.
(वाचा :नगरसेवकाच्या मुलांची गुंडगिरी, तरुणाच्या डोक्यात फोडल्या बिअरच्या बाटल्या)
सॉरी आई-बाबा...
'I Quit... या जगात राहणे आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक अवघड असते. मी नेहमीच एक चांगला व्यक्ती होण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी मी अयशस्वी ठरलो. मॉम, डॅड.. मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मला माफ करा. या परिस्थितीत मी जगू शकत नाही. आय क्विट.. (मी निरोप घेत आहे', अशा आशयाचा संदेश भिंतीवर लिहून गुरुप्रसादनं आपली जीवनयात्रा संपवली.
गुरुप्रसाद इयत्ता बारावीत होता. अभ्यासाच्या तणावातून त्यानं गळफास घेतल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
(वाचा : मित्राचीच बायको नेली पळवून.. जाब विचारणाऱ्याच्या भावाचीच केली हत्या)
गायीवरून तुफान राडा! पतीसमोरच महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण, पाहा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा