Home /News /maharashtra /

बीडमध्ये 17 वर्षीय मुलाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू, आईने फोडला टाहो

बीडमध्ये 17 वर्षीय मुलाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू, आईने फोडला टाहो

17 वर्षीय निलेश परमेश्वर बन्सड हा शाळा बंद असल्याने वडिलांना शेती कामात मदत करत होता.

बीड, 13 सप्टेंबर : लॉकडाऊनमुळे शाळा-कॉलेज, महाविद्यालय बंद आहेत. यातच शेतकऱ्याची मुले शेतामध्ये शेतकरी बापाला मदत करत आहेत. मात्र अशाच मदत करणाऱ्या 17 वर्षीय मुलाचा कांद्याचे रोप आणण्यासाठी रिक्षाने जाताना अपघात दुर्दैवी मृत्यू झाला. शाळा सुरू असती तर माझा मुलगा वाचला असता असा टाहो मुलाच्या आई-वडिलांनी फोडला आहे. ही हृदयद्रावक घटना बीड तालुक्यातील मौजवाडी गावात घडली आहे. 17 वर्षीय निलेश परमेश्वर बन्सड हा शाळा बंद असल्याने वडिलांना शेती कामात मदत करत होता. त्यातच कांद्याच्या लागवडीसाठी रोपे घेऊन येतो म्हणून मित्राच्या रिक्षात गावाकडून वडवणीकडे जात असताना रस्त्यातच रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात निलेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळा सुरू असत्या तर माझा निलेश वाचला असता असा टाहो निलेशच्या आईने फोडला. हेही वाचा - कॉलेज युवकाची निर्घृण हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण कोरोना महामारीच्या संकटात शाळा कॉलेज महाविद्यालय बंद आहेत. शाळेतील मुले घरी असल्यामुळे गावा खेड्यातील मुलेही आई-वडिलांना शेतात मदत करता.त मात्र दुर्दैवी अपघाताने निलेशच्या बाबतीत घडलेल्या घटनेने शाळा सुरू असती तर हा अपघात टळला असता म्हणून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या