Home /News /maharashtra /

10 वीच्या विद्यार्थ्याचं अपहरण, अभ्यासिकेला गेला आणि परत आलाच नाही...

10 वीच्या विद्यार्थ्याचं अपहरण, अभ्यासिकेला गेला आणि परत आलाच नाही...

दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात घडली आहे.

बीड, 22 फेब्रुवारी : अभ्यासिकेसाठी गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात घडली आहे. हा विद्यार्थी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून अजय कृष्णा मुंडे (वय 16वर्षे)असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. धारूर तालुक्यातील गांजापूरचा विद्यार्थी अजय मुंडे याचे वडील कृष्णा मुंडे हे शेतकरी असून मुलांच्या शिक्षणासाठी ते अंबाजोगाईत खडकपुरा भागात भाड्याच्या खोलीत राहतात. अजय सध्या खोलेश्वर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. अजय दोन दिवसांपूर्वी दुपारी 12 वाजता अभ्यास करण्यासाठी म्हणून एका खाजगी अभ्यासिकेत गेला. सायंकाळ झाली तरी तो घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो सापडला नाही. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन अजयचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा - सुट्टीसाठी मामाच्या गावाला गेलेल्या दोन लहानग्या मित्रांचा करूण अंत दरम्यान, घरातील मुलगा अचानक गायब झाल्याने अजयचं कुटुंब चिंतेत आहे. पोलिसांनी याप्रकरणी वेगवान तपास करावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Beed, Beed crime

पुढील बातम्या